DATE - 12/03/2019 - EunJi Cha , Junior Manager , POSCO ISDC Pvt.Ltd, Kharadi, Pune, 411 014, Maharastra, India. VISIT TO BALGRAM.

DATE - 26/08/2018  RAKSHA BANDHAN CELEBRATION.

Date - 18/02/2019

" WORLD CSR ORGANAZATION " यांच्या तर्फे World CSR Day या दिवशी जगातील चांगले कार्य करणाऱ्या CSR Company आणि सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या संस्था यांतील मोजक्याच व्यक्तींना " INTERNATIONAL AWARD " देण्यात आला. 
यामध्ये भारतातील 100 ( CSR ) कंपणी आणि NGOS यांना निवडण्यात आले होते. त्यात महाराष्ट्रातील 50 ( NGOS ) संस्थांना पुरस्कार देण्यात आला.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील संस्था मधून मला आणि माझ्या Nirankar Shikshan Prasarak Mandal, संस्थेला निवडून " MERIT OF CERTIFICATE " हा पुरस्कार TAJ LAND HOTEL , Bandra, Mumbai या ठिकाणी मोठ्या सन्मानाने तिबेटचे पाहुणे आदरणीय लामा यांच्या हस्ते देण्यात आला.
डॉ.आर.एल.भाटिया ( Founder Director - World Csr Organization ) यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आम्ही सर्व जण मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच समाजातील माझे बंधू आणि भगिनी तसेच आदरणीय देणगीदार व हितचिंतक यांना मी या पुरस्काराचे सर्व श्रेय देतो कारण आज ह्या सर्वांचा हा पुरस्कार आहे आणि तो मी यांना अर्पण करतो.

आपला.
केशव धेंडे,सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर,पुणे.
मोबा. नंबर - 9561816451

DATE - 09/03/2019  -  MIT COLLAGE - LONI CALBHOR, PUNE - STUDENT VISIT.

दिनांक - 25/08/2018
     नमस्कार.आज जनहितार्थ फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो आणि सर्व मुलांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्याचे भाग्य मला लाभले.

कै.सौ.निर्मला यादव गुणवत्ता पुरस्कार (Merit Awards) २०१८
******************************
         गुणवत्ता पुरस्कार वितरण सोहळा
Merit Awards Distribution Program 
*+*+*+*+*+*+*+*+*+* 
   पुणे आणि पुणे परिसरातील दहा माध्यमिक शाळांमधील सन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.वार्षिक परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी जनहितार्थ फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत शनिवार दिनांक २५ आगस्ट २०१८ सकाळी १०.०० वाजता आनंदराव बा.तुपे पाटील प्रगती हायस्कूल, काळेबोराटे नगर,हडपसर,पुणे येथे जाहीर गुणवत्ता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  जनहितार्थ फाउंडेशन पुणे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मला या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्या बद्दल मी सर्वाचा मनापासुन खुप खुप आभार मानतो.

DATE - 17-01-2019 - GUEST VISIT TO NIRANKAR BALGRAM

DATE - 09/08/2018   BIRTHDAY CELEBRATIO

DATE - 14/08/2018   BIRTHDAY CELEBRATION

DATE - 09 - 01 - 2019 - CHANDAN KUMAR ANNUAL DAY. NEW ENGLISH SCHOOL, HADAPSAR,PUNE.

DATE - 01/12/2018   -    PROGRAM CELEBRATION

DATE - 13/12/2018   -    RAJ BIRTHDAY CELEBRATION  CELEBRATION

DATE - 11/01/2019   -  BIRTHADAY CELEBRATION 

DATE - 31/12/2018   -  BIRTHADAY CELEBRATION 

DATE - 19/02/2019 SHIV JAYANTI FESTIVAL CELEBRATION

DATE - 08/12/2018   -    PROGRAM CELEBRATION

DATE - 01/03/2018

Today Kapil sir donated caps, shoes and water bottles for the kids.

Thanks you sir

DATE - 06/10/2018   - BIRTHDAY CELEBRATION

Date - 17/03/2019

         नमस्कार संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील " प्रयास ग्रुप " आला होता.विशेष म्हणजे हे सर्व एकाच काॅलेज मधील मित्र होते आणि काॅलेज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर IT क्षेत्रात पुणे या ठिकाणी नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर आपण पण समाजाचे देणे लागतो या भावनेतून दर महिन्याला एकत्र येऊन सामाजिक संस्थेला मदत करायची या हेतूने मदत गोळा करून त्या गरजूंना पोहचवायची. या तरुण समाज सेवकांचे हे कार्य पाहून मनाला खूप समाधान वाटले.
       या तरुण समाज सेवकांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. जाताना या " प्रयास ग्रुपने " संस्थेला मदत केली.
‌‌ संस्थेला सदिच्छा भेट दिली त्या बद्दल या सर्व तरुण समाज सेवकांचे आम्ही सर्वजण मनापासून आभार मानतो.

15/08/2018

         Our beloved Kapil Sir celebrated Independence day with us. He delivered an enlightening speech on India’s Independence and our freedom fighters and Snacks were distributed on this event.

Thanks Kapil Sir.

DATE - 17/02/2018

            Kapil Sir and his family organized a day’s outing for the kids today. They spent the entire day with us visiting Zoo, taking us for an educational movie on Shivaji Maharaj, took the children for rides in Appu Ghar and organized breakfast, lunch, evening snacks and transport. Kids were so delighted and enjoyed a lot.

           Thanks you so much Kapil, again.

Date - 24/03/2019

   नमस्कार आज संस्थेत सदिच्छा भेट देण्यासाठी आर्मीतील मेजर अभिजीत सर त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन आले होते.
संस्थेत येऊन त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली तसेच थोडावेळ थांबून निरोप घेतला.अभिजीत सरांनी संस्थेला मिळालेल्या जागतिक पुरस्कारा बदल मनापासून मला शुभेच्छा दिल्या.
    मेजर अभिजित सर आणि त्यांचे कुटुंबीय संस्थेत आल्या बदल आम्ही सर्वजण मनापासून त्यांचे आभार मानतो.

Date - 18/09/2018

नमस्कार. आज संस्थेच्या वृद्धाश्रमात VIBGYOR SCHOOL , MAGAR PATTA , HADAPSAR, PUNE. येथील इंग्लिश मिडीयम या शाळेतील इयत्ता - 2 वर्गातील मुले मुली भेट देण्यासाठी आले होते.
सर्व मुलांना व शिक्षकांना वृद्धाश्रमाबाबत नलिनी मॅडम यांनी माहिती दिली आणि सर्व मुलांनी आजीची आस्थेने विचारपूस केली तसेच मनमोकळ्या गप्पा मारल्या. वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी एकूण 200 मुले मुली आणि 25 शिक्षिका तसेच मावशी व बसचे चालक असे सर्व मिळून आले होते.

संस्थेच्या वृद्धाश्रमात VIBGYOR SCHOOL , MAGAR PATTA , HADAPSAR या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी तसेच शाळेचा कर्मचारी वर्ग आल्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून खूप खूप आभार मानतो.

CELEBRITION - 15 AUGUST -  2018

DATE - DATE - 09/09/2018  BIRTHDAY CELEBRATION

 DATE - 05/10/2018 -   AKASH GHODKE      BIRTHDAY CELEBRATION ​

Date - 06/01/2019

         नमस्कार संस्थेमध्ये पुण्यातील तरुण पिढीतील कार्यकर्ते भेटायला आले होते. संस्थेचे कार्य आणि माझे छोटंसं मार्गदर्शन घेण्यासाठी आले होते.
       मला भेटायला दोन वेगवेगळे ग्रूप आले होते आणि विशेष म्हणजे हे सर्व तरुण समाज सेवक खूप उत्साही आणि एकमेकांना विश्वासात घेऊन समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या विचाराने कार्य करणारी होती. या सर्व तरुण कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आणि भविष्यात असेच आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहून आशिर्वाद द्यावे अशी विनंती केली.
       माझ्या संस्थेला भेटायला आलेल्या दोन्ही उत्साही तरुण कार्यकर्ते यांचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.

DATE - 02/03/2019 - BIRTHDAY CELEBRATION

Nirankar Shikshan Prasarak Manadal

          " NIRANKAR BALGRAM "​​       
​​​INTERNATIONAL CSR AWARD WINING NGO - Feb - 2019 - 2020 & Feb - 2020 - 2021
DATE - 22/01/2019   -  BIRTHADAY CELEBRATION 

DATE - 02/09/2018  BIRTHDAY CELEBRATION

DATE - 16/02/2018

Kapil Sir (IT professional, Pune) distributed T-Shirts for the children.

Thanks Kapil Sir.

DATE - 27-02-2019 - LEDIES GRUP BIRTHDAY CELEBRATION

DATE - DATE - 09/09/2018  BIRTHDAY CELEBRATION

​SWARA KONDE - AGE - 03 YEARS

.Date - 24/09/2018

        नमस्कार आज विशेष कार्यक्रमाचे नियोजन करून CSR Activity यांच्या निमित्ताने KFC ( sogood " ) AMONORA , MAGARPATTA , Hadapsar येथे माझ्या संस्थेला निमंत्रण दिले होते.
आपण पण समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून KFC चे श्री. महेश कोटीयन सर ( Senior Area Coach , Pune. ) आणि त्यांचे बाॅस यांनी आणि त्यांच्या कर्मचारी या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतला. या निमित्ताने संस्थेला मोठ्या प्रमाणात अन्न धान्य यांच्या स्वरुपात मदत केली. तसेच सर्व मुलांना फुड देण्यात आले. या ठिकाणी सर्व मुलांनी खूप मजा केली.
        मला व माझ्या संस्थेला KFC यांनी मोठ्या मनाने बोलवून मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे बाॅस आणि महेश सर तसेच सर्व कर्मचारी यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

आपला.

केशव धेंडे,सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर पुणे.

DATE - 18/07/2018

Respected Kapil Sir (IT professional, Pune), denoted books for 3rd, 4th, 5th, 6th & 7th standard. He also donated couple of white boards, duster and markers.

This contribution really helped as we were in urgent need of those items.

Thank you Kapil Sir

DATE - 03/03/2019 - ESHITA BIRTHDAY CELEBRATION

DATE - 13/09/2018 -   NISHA       BIRTHDAY CELEBRATION ​

DATE - 21-01-2019 AMOL BHAGAT SIR ( FILM DIRECTOR,PUNE ) VISIT

DATE - DATE - 13/09/2018 -        RIDDHI        BIRTHDAY CELEBRATION ​

DATE - DATE - 28/09/2018 -   BHARGAV      BIRTHDAY CELEBRATION ​

Date - 14/10/2018

         नमस्कार आज संस्थेत पुण्यातील " Frankalin " INSTITUTE OF AIR HOSTESS TRAINING, Bund Garden Road , Pune. या काॅलेज मधील विद्यार्थी आले होते. संस्थेत येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून आले होते. प्रथम दर्शनी सर्व विद्यार्थ्यांना पाहिल्यावर वाटले नव्हते की हे सर्व खूप अॅकटीव असतील. परंतु सुरूवातीला सर्वांची ओळख झाली आणि मग सर्व विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. नंतर त्यांनी त्यांच्या काॅलेज मधील अभ्यासा बाबत माहिती दिली आणि AIR HOSTESS बद्दल माहिती दिली.
       संस्थेत सर्व विद्यार्थ्यांनी मनमोकळ्यापणे आणि आपलं पणाने वेळ घालविला. त्यांच्या बरोबर कसा वेळ गेला हे कळालेच नाही.जाताना एक आठवण म्हणून माझ्या बरोबर सर्वांनी फोटो काढला. संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

Date - 06/10/2018

         नमस्कार.आज संस्थेमध्ये लोणी काळभोर येथील " समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय ", लोणी काळभोर, ता. हवेली, जिल्हा. पुणे येथील काॅलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आले होते. संस्थेत आल्यानंतर विद्यार्थी व सरांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.विशेष गप्पा आणि चर्चा करण्यात आली.
या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून अभिषेक अनिल मुळे याचा वाढ दिवस संस्थेत साजरा केला. आपणही समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी ह्या भावनेतून अभिषेकने त्याचा वाढदिवस संस्थेमध्ये साजरा केला. तसेच वाढ दिवसाच्या निमित्ताने अन्नधान्य यांच्या स्वरुपात आणि एक हजार रुपयांचा चेक अशा स्वरूपात मदत केली.आणि भविष्यात संस्थेला सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
   संस्थेत समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर या काॅलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आल्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून या सर्वांचे खूप खूप आभार मानतो.

आपला.
केशव धेंडे, सर

DATE - 18/10/2018 - SANGHARSH  BIRTHDAY CELEBRETAION

DATE - 15/01/2019   -  BIRTHADAY CELEBRATION 

DATE - 25/12/2018   -  CHRIMUS CELEBRATION  CELEBRATION

Date - 24/11/2018

       नमस्कार आज संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी श्री बालाजी मंदिर , केतकावळे , ता. पुरंदर जिल्हा. पुणे येथील मंदिरातील पुजारी मा.श्री. निलेश पेशकार आणि मा.श्री. रूषिकेश रणनवरे ( पाटील ) हे आले होते.
मा. गुरुजींनी संस्थेला मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच संस्थेत मनमोकळ्या गप्पा मारून थोडावेळ थांबून मग आपल्या मार्गी निघुन गेले.
     मंदिरातील पुजारी मा.श्री. निलेश पेशकार आणि मा.श्री. रूषिकेश रणनवरे ( पाटील ) हे संस्थेत आल्या बदल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

Date - 09/12/2018

          नमस्कार आज संस्थेमध्ये " Mphasis Ltd, Tower No - 4, Magarpatta, Hadapsar,Pune. या कंपनीतील तरुण युवकांचा ग्रुप भेट देण्यासाठी आला होता. संस्थेत आल्यावर या सर्व तरुण युवकांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि सर्वांना योग्य मार्गदर्शन केले.हे सर्व युवक सर्व साधारण घरातील होते आणि त्यांना सामाजिक वस्तू स्थितीची जाणीव दिसून आली.हया सर्वांनी मिळून संस्थेला एक गरजेची भेट वस्तू - नवीन शिलाई मशीन दिली.
     खरोखरच या सर्व तरुण पिढीतील समाज सेवकांना भेटून खूप आनंद झाला आणि समाजासाठी आपण काही तरी देण लागतो याची जाणीव पहायला मिळाली.
     Mphasis Ltd , Magarpatta, Hadapsar या कंपनीतील तरुण यूवक संस्थेत आल्या बदल त्यांचे सहकारी मॅनेजर या सर्वांचे आम्ही सर्व जण मनापासून खूप खूप आभार मानतो.

DATE - 26/12/2018   -  FILM FESTIAVL CELEBRATION  CELEBRATION

Date - 14/11/2018

       नमस्कार. संस्थेत माझे फेसबुक वरील आदरणीय मित्र श्री. संतोष कंद आणि त्यांचे जवळचे मित्र परिवार भेटायला आले होते. येताना त्यांनी दिवाळीचा फराळ सोबत आणला होता.विशेष म्हणजे आज पर्यंत आम्ही एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो किंवा फोनवर संभाषण झाले नव्हते. फक्त फेसबुकवर माझ्या कार्याची पोस्ट पाहून मला भेटायला आले होते. त्यांना व त्यांच्या मित्र परिवार यांना भेटून खूप छान वाटले आणि आनंदही झाला.
      दुसऱ्या एका कार्यक्रमात " माणुसकीचा कट्टा " या ग्रुपच्या माध्यमातून आपण पण समाजाचे काही तरी देणं लागतो ह्या भावनेतून या ग्रुपचे तरुण कार्यकर्ते यांनी संस्थेत सदिच्छा भेट दिली.हे तरूण कार्यकर्ते संस्थेत आल्यानंतर त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि मग माझ्या बरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या.खरोखरच या तरुण कार्यकर्ते यांना भेटून खूप छान वाटले.हे तरुण कार्यकर्ते संस्थेत येण्या मागे माझे आदरणीय मित्र श्री. अक्षय गलांडे साहेब ( अध्यक्ष - भैरवनाथ प्रतिष्ठान, वडगावशेरी, पुणे.) यांचे श्रेय आहे.या बद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.
वरील दोन्ही पाहुणे संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.


Date - 09/10/2018

       नमस्कार.आज JOY OF GIVING यांच्या निमित्ताने माझ्या संस्थेला विशेष निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून " ORANGE Ivy Playschool " Marketyard , Pune. येथील इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या प्रिंसीपल मिस. शिखा गुप्ता मॅडम आणि या शाळेचे डायरेक्टर श्री. अशिश आगरवाल सर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी या सर्वांनी JOY OF GIVING याचे नियोजन केले होते.
        या छोटया माझ्या सर्व बाळाऺनी संस्थेला अन्नधान्य यांच्या स्वरुपात मदत केली. खरोखरच या छोट्या वयात या मुलांना त्यांच्या प्रिन्सिपॉल मॅडम यांनी समाजासाठी आपण पण देणं लागतो ह्या भावनेतून छोट्या मुलांच्या पालकांना समजून सांगितले आणि या पालकांनी मॅडम यांच्या शब्दाला मान देऊन जमेल तशी मदत केली.
       आज आम्हाला खूप आनंद झाला की छोट्या या माझ्या भावंडांना दुसर्यांना मदत करण्याचं भाग्य मिळाले.
       दुसऱ्या एका कार्यक्रमात वाढ दिवसाच्या निमित्ताने संस्थेमध्ये POSCO INDIA CO. LIMITED , CORIYA. या कंपनीतील HR या विभागातले श्री.सतिश पाटील सर आले होते. आणि JUST DIAL या कंपनीतील सेल्स विभागातील रेखा शेडगे मॅडम आल्या होत्या.

Date - 16/03/2019

        नमस्कार आज संस्थेमध्ये प्राध्यापक राहुल ढवाण ( उपसरपंच - औटेवाडी, ता- कर्जत, जि - अहमदनगर ) येथून सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. त्यांना माझ्या संस्थेच्या वतीने " कार्य प्रेरणा " हे पुस्तक भेट देण्यात आले.
         सरांनी त्यांच्या गावात समाज उपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. सर स्वतः " आदर्श प्रतिष्ठान " या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.तसेच या संस्थेच्या माध्यमातून गावातीलच गरीब कुटुंबातील ४० मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच दुष्काळी भागात जनावरांना चारा वाटप केले आहे आणि ग्रामीण भागात एड्स बाबत जनजागृती कार्यक्रम राबविले आहेत.सर स्वतः सा.फेरफटका या वृत्तपत्राचे संपादक आहेत. असं राहुल सरांचे कार्य चालू आहे.
       उपसरपंच सर माझ्या संस्थेत येण्यामागचे कारण म्हणजे त्यांना माझ्याकडून समाज कार्यासाठी मार्गदर्शन हवे होते आणि ते मी त्यांना मनापासून केले.मला सामाजिक क्षेत्रात " CSR चा जागतिक पुरस्कार मिळाला आहे त्या बद्दल माझे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.

Date - 02/12/2018

      नमस्कार आज संस्थेमध्ये " सिंहगड काॅलेज आॅफ आर्किटेक्चर , पुणे." येथील विद्यार्थी आले होते.
विशेष म्हणजे हे विद्यार्थी संस्थेत येण्याचे कारण म्हणजे यांना एका प्रकल्पात " NARI GANDHI TROPHY " ( NASA - America - National Association Of Students Of Architecture ) माझ्याकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते. माझ्या परीने त्यांना योग्य मार्गदर्शन केले.आणि जाताना त्यांच्या या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा दिल्या.
        आजच्याच दिवशी दुसरया फोटो तीला विद्यार्थी हे SYMBIOSIS CENTER For STUDIES ,Viman Nagar , Pune. या काॅलेजमधील विद्यार्थी आले होते. यांचे येण्याचे कारण म्हणजे की समाजातील संस्थांना मोफत सेवा देण्यासाठी तरूण युवकांनी सहभाग घ्यावा का या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते. मला जे योग्य वाटत होते त्यावर या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

         संस्थेला भेट देण्यासाठी आल्या बदल आम्ही सर्व जण या तरुण युवकांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

DATE - 22/12/2018   -    ROHAN BIRTHDAY CELEBRATION  CELEBRATION