Date - 27/10/2024
नमस्कार आज संस्थेत दिपावलीच्या निमित्ताने पुण्यातील " जय जिजाऊ जय शिवराय सोशल फाउंडेशन ग्रुप, पुणे" यांचे सर्व आदरणीय शिष्टमंडळाने भेट दिली.
खरोखरच या ग्रुप मधील शिष्टमंडळाचे सर्व सदस्य खूप मनमिळावू स्वभावाचे आणि सामाजिकतेची जाणीव असलेले दिसले. त्यांच्या कार्यातून हे प्रत्यक्षात मला जाणवले. त्यांच्या ग्रुप तर्फे संस्थेच्या मुलांची दिवाळी साजरी करण्यात आली तसेच सर्व मुलांना नवीन कपडे देण्यात आले आहे आहे तेव्हा माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
"जय जिजाऊ जय शिवराय सोशल फाउंडेशन ग्रुप, पुणे" यांनी माझ्या संस्थेच्या मुलांची आनंदी दिवाळी साजरी केली आहे त्या बद्दल आम्ही ग्रुप मधील सर्व सदस्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. तसेच हांडेवाडी, हडपसर येथील "LEXICON KID'S SCHOOL, HANDEWADI" येथील शाळेत दिपावली निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात मला Chief Guest म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी माझ्या संस्थेला दिवाळी निमित्त मदत केली याबद्दल प्रिन्सिपॉल मॅडम यांचे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
Adv. Keshav Dhende, Sir
Date - 10/04/2022
नमस्कार आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा माझ्या कार्याची दखल घेऊन " सकाळ वृत्तसेवा" यांनी B G DREAM या द्वारे माझी मुलाखत घेतली आहे. या आधी यांनी 2011 रोजी माझ्या कार्याची दखल घेऊन मला समाजासमोर आणले होते या कारणांमुळे त्यावेळी मला भरभरुन मदत झाली होती.
आपणांस सांगण्यास आनंद वाटतो की मुलाखत घेण्यासाठी काही सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना निवडले होते परंतु या सर्वांच्या मधुन मला व माझ्या कार्याची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माझा लहानपणा पासूनचा जीवन पट ते आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा या मुलाखतीतून समाजासमोर यावा या उद्देशाने मुलाखती साठी मला फोनवर निमंत्रण दिले होते. हे ऐकून मला खूप आनंद झाला होता. मला या मुलाखतीतून माझ्या आयुष्यातील घडलेल्या घटना आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल मला समाजासमोर मनमोकळ बोलता आले आहे. या बद्दल मी खूप नशीबवान आहे असं समजतो.
माझ्या या या मुलाखतीतून समाजासमोर माझे कार्य आणल्या बद्दल मी सकाळ वृत्तसेवा आणि B G DREAM यांच्या सहकार्याचे मनापासून आभार मानतो. तसेच माझी YouTube वरील मुलाखत पाहून माझ्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणारे समाजातील सर्वांना मनापासून आभार मानतो
Date - 15/04/2022
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील नामांकित काॅलेजचे तरुण युवक आले होते. Vishwakarma Institute of Technology (VIIT,Pune) Vishwakarma University (Kondhwa,Pune) And Singhagad Institute of Technology (Kondhwa,Pune) या काॅलेज मधील विद्यार्थ्यांनी माझ्या संस्थेचे कार्य ऑनलाईन पाहिले होते. म्हणून त्यांनी मला संस्थेच्या भेटीसाठी विनंती केली होती. संस्थेत आल्यावर त्यांनी सर्व मुलांच्या बरोबर खूप मजा केली. नंतर या सर्व तरुण युवकांना माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांना सामाजिक क्षेत्रा बद्दल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या कार्यक्रमात माझे आदरणीय मित्र श्री. हरी सावंत सर, साडे सतरा नळी, हडपसर, पुणे यांनी मला एका गरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी विनंती केली होती.या व्यक्तीला लाईटचे काम करताना शिडी घसरून खाली पडले होते यामुळे त्यांच्या कमरेला आणि पायाला अपघात झाला होता. आता त्यांना जड काम होत नाही. घरात कमावणारे एकटेच असल्याने खाण्याचे हाल झाले होते. म्हणून मग मी सरांच्या विनंतीला मान देऊन त्या व्यक्तीला संस्थेच्या वतीने अन्नधान्य धान्याच्या स्वरूपात मदत करण्यात आली. मला आनंद वाटतो की माझ्या संस्थेच्या वतीने खरोखरच गरजूंना वेळोवेळी मदत करू शकतो या बद्दल. पण यांचे सर्व श्रेय मला मदत करणार्या दानशूर व्यक्तींना जाते.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
दिनांक - 17/01/2018
नमस्कार. आज संस्थेमध्ये हांडेवाडी येथील डॉ.दिशा प्रजापती आणि कौशिक प्रजापती हे त्यांची कन्या रुद्रा हीचा 6 वा वाढ दिवस साजरा करण्यासाठी आले होते.
सर्व मुलांच्या बरोबर केक कापून वाढ दिवस साजरा करण्यात आला. रुद्राच्या वाढ दिवसाच्या साठी प्रजापती यांचे मित्र पण आले होते. मोठ्या आनंदाने वाढ दिवस साजरा करण्यात आला. संस्थेमध्ये वाढ दिवस साजरा करण्यासाठी आले होते त्या बद्दल आम्ही खूप खूप आभार मानतो.
आपला,
केशव धेंडे, सर
Date - 17/07/2018
नमस्कार. संस्थेमध्ये दिनांक - 16/07/2018 रोजी सायंकाळी पाच वाजता हडपसर, शंकर मठ ,रामटेकडी येथून वस्तीतील एका तरुण समाजसेवकाचा मला फोन आला की वस्तीतील एका महिलेचा सकाळी 8 वाजता चहा बनवताना स्टोव्हचा भडका होऊन भाजल्या या कारणांमुळे तिला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या मागे फक्त एक सहा वर्षांचा मतिमंद मुलगा त्या घरात राहीला होता. आणि त्याचे वडील बेपत्ता आहेत.तो मुलगा पूर्णपणे कुपोषित होता आणि एका डोळ्याने अंध होता. त्या मुलाची तशी अवस्था बघितलं की डोळ्यातुन पाणीच येईल,अशा भयानक परिस्थितीत त्याला सांभाळण्यासाठी कोणी शेजारचे तयार नव्हते.
परंतु त्याच वस्तीतील एक तरुण युवक श्री. सोनू चव्हाण याला त्या मुलाची परीस्थिती पहावली नाही आणि त्याने त्या मतिमंद मुलाला घेऊन मांजरी येथील एका मतिमंद संस्थेत एका रात्रीसाठी ठेवले होते परंतू त्या संस्थेने त्या मुलाची परिस्थिति बघून एकच रात्र ठेवण्याची परवानगी दिली. एका रात्रीसाठी मदत झाल्याने सोनू आणि त्याच्या चार मित्रांना खूप बरे वाटले.आणि तेथून मग ही मंडळी घरी आली. परंतु खरा मोठा प्रश्न होता की दुसऱ्या दिवशी त्याला ठेवायचं कुठे?
आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला त्याचा मित्र अमित अडसूळ याने माझा नंबर दिला आणि मग मला फोन आल्यावर मी फोनवर बोललो आणि मग त्या मतिमंद मुलाची परीस्थिती ऐकल्यावर माझ्या संस्थेत ठेवण्यासाठी मी परवानगी दिली. माझ्याकडे त्या मुलाला ठेवताना मी त्याची कागदपत्रे मागवली. त्यात त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याचे माझ्या संस्थेच्या नावाचे पत्र आणि स्थानिक नगरसेवक यांचे शिफारस पत्र तसेच सोनू चव्हाण यांचे वैयक्तिक अर्ज ही सर्व कागदपत्रे मला दिली. मी त्या मुलाची दोन दिवस खूप काळजी घेतली.अशा मतिमंद मुलांना सांभाळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मला कळाले. आज सकाळी अकरा वाजता त्या मुलाला सोनू चव्हाण आणि त्यांचे तीन मित्र यांनी माझ्या संस्थेतून घेऊन गेले.आज एका वानवडीतील संस्थेने त्याला सांभाळण्याची तयारी दाखवली परंतु त्या संस्थेने त्याची परिस्थिती बघितल्यावर प्रवेश नाकारला.शेवटी त्याला सोनूने ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्याला एक नवे जीवनदान मिळाले.आणि मला आपण केलेल्या एका छोट्या मदतिने त्या मुलाची सेवा केल्याचं समाधान मिळाले. या सेवेत सोनुचे मित्र श्री. विनय. आळकुंठे, श्री.समिर माने आणि श्री.शुभम आळकुंठे ह्यांनी मदत केली.
Date - 12/12/2023
नमस्कार आपणांस कळविण्यात एक प्रकारे दुःख वाटते की आजच्या या संघर्षमय परिस्थितीत काही कुटुंबांमध्ये एकवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे महत्वाचे बेरोजगारी आणि स्वतः च्या कुटुंबातील गरजा भागविण्यासाठी जवळ पैसे नाहीत.
मनाला खूप वाईट वाटते पण मी काही मोठा व्यक्ती नाही मी एक सामान्य व्यक्ती आहे. आज संस्था चालवत असताना समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेले माझ्या संस्थेच्या मुलांना जे अन्नधान्य मिळते त्यातूनच मी समाजातील गरीब व गरजू लोकांना, कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना मदत करत असतो.
वरील फोटोतील दोन व्यक्ती ह्या बहिण भाऊ आहेत. त्यांनी मला फोन करून विनंती केली होती म्हणून मी माझ्या संस्थेच्या वतीने जमेल तशी अन्नधान्य देऊन मदत केली आहे.समाजातील प्रत्येकाने जरी अशी छोटीशी मदत केली तर कोणी गरीब व्यक्ती किंवा कुटुंब त्या दिवशी उपाशी पोटी झोपणार नाही हे नक्कीच.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 10/03/2018
नमस्कार आज सायंकाळी YES BANK, Pune Head Office यांनी पुण्यातील ठराविक संस्थांना आमंत्रित केले होते. विषय होता त्यांच्या " YES FOUNDATION " या संस्थेच्या वतीने CSR या अंतर्गत फंड उपलब्ध करून या संस्थांना सक्षम करणे. बँक मॅनेजर यांनी CSR PROJECT संदर्भात सर्व संस्थांना छान मार्गदर्शन केले.
या ठिकाणी निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. केशव धेंडे, सर यांना आमंत्रित केले होते. आलेल्या प्रत्येक संस्थेच्या प्रतिनिधी यांनी आपापल्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. बँकेच्या वतीने प्रत्येक संस्थेच्या व्यक्तींचा " MONEY PLANT TREE " देऊन सत्कार करण्यात आला.

Date - 17/07/2018 INDIGO STAFF VISIT TO NIRANKAR BALGRAM
Date - 08/02/2018
नमस्कार. आज संस्थेमध्ये सायंकाळी वाढ दिवस साजरा करण्यासाठी ससाने नगर, हडपसर येथील श्री. निरंजन शिवरकर आणि त्यांचे कुटुंबीय आले होते. त्यांचा लहान मुलगा कु. वरद निरंजन शिवरकर ह्याचा पहिल्या वर्षांचा वाढदिवस साजरा केला.
सर्व मुलांच्या बरोबर केक कापून वाढ दिवस साजरा करण्यात आला.तसेच वाढ दिवसाच्या निमित्ताने सर्व मुलांना जेवण देण्यात आले.
वरदचा वाढदिवस संस्थेत साजरा करण्यात आला त्या बद्दल आम्ही सगळे त्यांचे आभार मानतो.
Date - 06/11/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असणारी आणि समाजातील गरजू लोकांच्या पर्यंत पोहोचणारी तसेच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करणारया संस्थेचे माझे आदरणीय सहकारी शगुन अग्रवाल मॅडम आले होते.
"Round Table India" हि संस्था शैक्षणिक क्षेत्रातील खरोखरच गरजू असणाऱ्या संस्थांना मदत करते आणि विशेष म्हणजे हि संस्था गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इमारत निधी उभारून छान शाळा बांधून देतात. आता पर्यंत त्यांनी विविध संस्थेच्या शाळांना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून छान इमारत बांधून दिल्या आहेत. खरोखरच या संस्थेचे कार्य खूप मोठे आहे.
आज माझ्या संस्थेत मला भेटायला येण्यापूर्वी एक तास आधी मला फोनवर बोलून येण्यासाठी विनंती केली होती आणि लगेचच तासाभरात मॅडम माझ्या संस्थेत आल्या. शगुन मॅडम यांना माझ्या संस्थेचे कार्य खूप आवडले आहे त्यामुळे त्यांनी माझ्या संस्थेच्या बरोबर मदतीसाठी हात पुढे केला आहे.
"Round Table India" ह्या संस्थेचे शगुन अग्रवाल मॅडम यांनी माझ्या संस्थेला भेट दिली आहे त्या बद्दल आम्ही सर्व त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
ॲड.केशव धेंडे, सर
Date - 26/02/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज माझ्या संस्थेला POSCO STEEL COMPANY(CORIEN) यांनी विशेष भेटीसाठी निमंत्रण दिले होते.
मागे कोरोनाच्या आधी म्हणजे साल 2019 रोजी "POSCO ISDC, या कंपनीचे HR कोरियन मॅडम यांनी संस्थेला भेट दिली होती आणि कंपनी तर्फे संस्थेला मदत केली होती.
आणि आज पाच वर्षांनी पुन्हा एकदा माझ्या संस्थेला निमंत्रण दिले होते.POSCO ISDC,Tower No- 1, World Trade Center, Kharadi,Pune. कंपनीचे माझे आदरणीय Goswami Sir (HR & LEGAL) सरांनी फोन करुन भेटायला बोलावले होते. सर्वात आनंदाची बाब म्हणजे आज मिटिंग मध्ये POSCO ISDC & NIRANKAR TRUST यांच्या बरोबर एकत्रीत काम करण्यासाठी ठरावाची चर्चा करण्यात आली. या वेळी मला खूप आनंद झाला की माझ्या संस्थेची निवड करण्यात आली आहे म्हणून. यावेळी कंपनीच्या मिटिंगसाठी माझ्या सोबत माझे संस्थेचे सोशल वर्कर आदरणीय वैशाली बागूल मॅडम ह्या बरोबर होत्या.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 21/09/2022
नमस्कार काल नाशिक येथे माझे आदरणीय सहकारी मित्र श्री.दिपक शेळके सर ( संस्थापक अध्यक्ष - साई धन्वंतरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, नाशिक) तसेच त्यांचे आदरणीय वकील मित्र यांनी मला त्यांच्या नर्सिंग इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यांच्या निमंत्रणाचा आदर करत मी आणि माझ्या संस्थेच्या आदरणीय वैशाली बागूल मॅडम (MSW & BSW) आम्ही दोघेही गेलो होतो.
मला अभिमान वाटतो की माझ्या कार्याची दखल महाराष्ट्रातील सर्व आदरणीय व्यक्ती आणि संस्था दखल घेतात आणि माझा मान सन्मान करतात. त्याच योग्यतेची दखल घेत आदरणीय दिपक सरांनी माझा सत्कार शाल घालून केला.तसेच त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सरांनी मला नाशिक येथे नवीन प्रकल्प चालू करण्यासाठी विनंती केली. मिटिंग संपल्यावर सरांनी एका ठिकाणी म्हणजे नाशिकची प्रसिद्ध " साधना मिसळ" येथे नेले.पाहूनचार छान केला होता. खरोखरच मला इतका आदर सत्कार केलेला पाहून खूप मनाला समाधान झाले. आणि शेवटी त्यांचा निरोप घेताना त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानले.
आपला सेवक.
श्री.केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ,
(International CSR Award Wining NGO and American Merit Council Appreciate Award - 21/11/2021 & World Book of Records London Appreciation Letter - 17/08/2022)
Date - 20/11/2022
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की "अभिनव काॅलेज, पुणे" या काॅलेजचे माझे आदरणीय विद्यार्थी मित्र संस्थेच्या भेटीसाठी आले होते. संस्थेच्या भेटीसाठी त्यांनी फोनवर विनंती केली होती. आणि त्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीचा वाढ दिवस संस्थेच्या सर्व मुलांच्या बरोबर साजरा केला.
संस्थेचे कार्य अभिनव काॅलेज मधील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाहिले होते आणि त्यांचे आदरणीय सर श्री. विशाल दरवडे, संस्थापक "IRA MULTIMEDIA INSTITUTE, Sadashiv Peth,Pune.) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या भेटीसाठी येण्याचा छान कार्यक्रम तयार केला. या सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रातील विषयांवर छान मार्गदर्शन केले तसेच या माझे सर्व आदरणीय समाजसेवक विद्यार्थी मित्रांना त्यांच्या पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. मला अभिमान वाटतो की आजची तरुण पिढी समाज सेवेकडे वळत चालली आहे आणि त्यांच्या परीने समाजातील विविध घटकांना मदत करत आहे. या बद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 09/11/2022
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या कार्याची, संस्थेची दखल महाराष्ट्रातील संस्था आणि आदरणीय माझ्या समाजातील लहान थोर व्यक्ती घेत आहेत. आणि त्याचीच एक दखल म्हणून महाराष्ट्रातील एक संस्था " THE LAST TRUTH FOUNDATION" माजलगाव,बीड या संस्थेचे संस्थापक सचिव श्री. रुषिकेश अशोकराव टाकणखार सरांनी मला विनंतीचे पत्र मला पाठविले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यातील आहेत.साधारण नोव्हेंबर ते मे हे सहा महिने ऊसतोड मजूर कामासाठी बीड जिल्ह्या बाहेर जातात.जाताना आई वडील त्यांच्या लहान मुलांना घरातील मोठ्या व्यक्तींच्या म्हणजे आजी आजोबा यांच्या ताब्यात देऊन जातात. विशेष म्हणजे या मुलांचे या काळात शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून तेथील जवळपास शाळेत पाठवितात. पण या मुलांना शिक्षणाच्या बरोबर शैक्षणिक साहित्य मिळत नाही म्हणून त्यांची अडचण निर्माण होते. तसेच थंडीच्या दिवसात यांना स्वेटर्सची , बुट, चप्पल यांची गरज पडते.
खरे पाहता या गरीब मुलांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून मला या मुलांना मदत करायची आहे. यासाठी माझ्या संस्थेच्या वतीने पन्नास मुलांना थंडीसाठी स्वेटर्स आणि तीस मुलांना शैक्षणिक दप्तर असे मिळून 80 मुलांना मदत करत आहे. तो कार्यक्रम डिसेंबर महिन्यात घेणार आहे. हि सर्व मोलाची मदत हि माझ्या संस्थेच्या आश्रमातील मुलांना मिळालेल्या डोनेशन मधून देत आहे. महत्वाचे सांगायचं तर हे मी करतोय ते सर्व माझे आदरणीय डोनर व्यक्ती यांच्या मदतीमुळे. आणि याचे सर्व श्रेय आणि आशिर्वाद या सर्व व्यक्तींना जाणार आहे. आपणांस मनापासून विनंती आहे की जर तुम्हाला मदत करायची असेल तर मला कळवा.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
दिनांक - 01/06/2018
नमस्कार आज संस्थेमध्ये आमचे आदरणीय साहेब श्री. महेंद्र भाऊ चौरे हे त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांसह आले होते.येण्याचे कारण म्हणजे आज महेंद्र चौरे साहेबांचा वाढ दिवस होता.आणि त्यांचा हा वाढ दिवस सर्व मुलांच्या बरोबर केक कापून आणि फळं वाटप करून साजरा करण्यात आला. नंतर संस्थेच्या वृद्धाश्रमातील आजींना फळं वाटप करण्यात आली.
चौरे साहेब त्यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने आले होते परंतू साहेब नेहमीच माझ्या संस्थेला मदत करत आले आहेत.तसेच माझे आदरणीय श्री. विलास लोंढे सर यांच्या मुळेच महेंद्र भाऊ चौरे साहेब यांची ओळख झाली आहे.
चौरे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचे आम्ही सर्वजण मनापासून खूप खूप आभार मानतो.
आपला.
केशव धेंडे,सर
मोबा. - 9561816451
Date - 03/09/2023
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी कोरेगाव पार्क येथील कंपनी CSR ACTIVITIES साठी आली होती. या कंपनीचे नाव "BFS" (Basic Fly Studio Limited) Smart Works North, Koregaon Park Road, Pune. हि कंपनी फिल्म इंडस्ट्रीत BFS Editing करते.या कंपनीने साऊत मुव्ही "बाहुबली" साठी सुद्धा काम केले आहे.
या कंपनीचे सर्व आदरणीय सहकारी संस्थेत आल्यावर त्यांनी संस्थेला मदत केली आणि सर्व मुलांच्या बरोबर छान वेळ घालवला. या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. BFS कंपनीचे आदरणीय HR Madam आणि त्यांचे आदरणीय सहकारी वर्ग संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आजची तरुणाई सामाजिक क्षेत्रात मनापासून कार्य करत आहेत यासाठी मनापासून माझा सलाम.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 24/08/2023
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी "St. Miras College For Girls, Koregaon Road, Pune. या विद्यालयातील माझे आदरणीय विद्यार्थीनी आल्या होत्या. त्यांना माझ्या संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती मिळाली होती आणि त्यांच्या काॅलेज कडून माझ्या संस्थेची निवड झाली होती. संस्थेत आल्यावर या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच त्यांना सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शन केले. पुढे भविष्यात त्यांना या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल.
तसेच दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी पुण्यातील MIT COLLEGE, PUNE, या काॅलेज मधील माझे आदरणीय विद्यार्थी आले होते. त्यांना सुद्धा संस्थेच्या कार्याची माहिती दिली. मला आनंद वाटतो की सध्याची तरुणाई सामाजिक क्षेत्रात स्वतः चा महत्वाचा वेळ देत आहे या बद्दल मनापासून त्यांचे अभिनंदन करतो.
St. Miras College For Girls, Pune आणि MIT COLLEGE, PUNE या काॅलेजचे माझे आदरणीय विद्यार्थी मित्र संस्थेच्या भेटीसाठी आले होते म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 01/12/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज संस्थेच्या भेटीसाठी बेंगलोर स्थित संस्था आली होती. या संस्थेचे सामाजिक कार्य सम्पूर्ण भारतात चालते. संस्थेच्या कार्याची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
या " Fly Higher (FHI), APMVM " फाउंडेशनचा एक उपक्रम 2018 पासून संपूर्ण भारतातील वंचित मुले आणि तरुणांमध्ये जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. खरोखरच त्यांचे हे सामाजिक क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे.
या संस्थेचे माझे आदरणीय सर्व तरुण कार्यकर्ते संस्थेत आल्यावर त्यांनी मुलांच्या बरोबर विविध स्पर्धा आणि खेळ घेतले. त्या सर्वांनी मुलांच्या बरोबर मनापासून खूप आनंद घेतला आहे. एक प्रकारे त्यांना संस्थेत येऊन छान वाटले आहे.
माझे आदरणीय सहकारी मॅडम " संकेता हुद्दार " यांनी त्यांच्या वतीने संस्थेला मदत केली आहे. या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
ॲड. केशव धेंडे, सर
DATE - 15/01/2018 CHAITANYAS BIRTHDAY CELEBRATION
Date - 06/05/2022
नमस्कार, आज संस्थेच्या भेटीसाठी D.P.S SCHOOL,(Dellhi Public School) Mahammad Wadi, Hadapsar, Pune. येथील शाळेतील इयत्ता - 9 वीचे विद्यार्थी आले होते. संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी आणि संस्थेतील काम कसे चालते हे पाहण्यासाठी हे आदरणीय तरुण विद्यार्थी आले होते. त्यांनी संस्थेत आल्यावर सर्व मुलांच्या बरोबर खूप एन्जॉय केला तसेच मुलांना खाऊ दिला. नंतर या सर्व विद्यार्थी यांना मी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
तसेच दुसर्या कार्यक्रमांत AMDOCS COMPANY, MAGAR PATTA, PUNE. येथील कंपनीतील IT Engineer तरुण मुलींनी त्यांच्या जीवलग मैत्रीणीचा वाढ दिवस माझ्या मुलांच्या बरोबर साजरा केला होता. आणि विशेष म्हणजे या सर्व तरुण युवतींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यातील पल्लवीने तिचा वाढ दिवसांच्या निमित्ताने माझ्या सर्व मुलांना BARBEQUE NATION (AMONORA, MAGARPATTA, PUNE) येथे एका मोठ्या हाॅटेल मध्ये नेऊन पोटभरून जेवायला घातले आहे. तिने इतर मित्रांच्या बरोबर वाढ दिवस साजरा न करता आणि वायफळ खर्च न करता अनाथ मुलांना अन्नदान केले आहे. हाच खूप मोठा आशिर्वाद तिला आणि तिच्या मैत्रिणींना तसेच तिच्या कुटुंबीयांना मिळाला आहे. आजची युवा पिढी सामाजिक क्षेत्रात मनापासून कार्य करत आहे या बद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
Date - 05/07/2022
नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की महंमद वाडी, हडपसर, पुणे. येथील डॉ. दादा गुजर माध्यमिक विद्यालय, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते. ज्या शैक्षणिक संस्थेत मी शिपाई पासून ते हेड क्लर्क पर्यंत दोन वर्ष नोकरी केली होती ती सुद्धा सरकारी नोकरी होती त्या नोकरीचा राजीनामा देऊन दुसरया कामांत व्यस्त झालो होतो. आणि आज त्याच शैक्षणिक संस्थेत इयत्ता - दहावीच्या " पालक मिटिंगमध्ये" प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते.
आज त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहताना जो मानसन्मान दिला त्याचा मला खूप अभिमान वाटला. आज मी माझ्या सामाजिक क्षेत्रातील कार्याने या पदावर पोहोचलो आहे याचे समाधान झाले आहे. विशेष म्हणजे माझे आदरणीय सहकारी मित्र श्री. डि.एम.पाटिल, सर (मुख्याध्यापक) आणि आदरणीय शिक्षक स्टाफ यांनी मला हा सन्मान दिला. या बद्दल मी माझ्या संस्थेच्या वतीने विद्यालयाचे आणि आदरणीय पाटील सरांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर ( BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे. (International CSR Award Wining NGO and American Merit Council Appreciate Award - 21/11/2020)

Date - 24/05/2022
नमस्कार आज माझे आदरणीय सहकारी मित्र श्री.राहूल ढवान सर ( संस्थापक अध्यक्ष - अराध्य एनजीओ सपोर्ट सेंटर, औटेवाडी) यांच्या विशेष विनंती वरून " राज्य स्तरीय संस्था सक्षमीकरण व निधी संकलन कार्यशाळा " या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते.
तसेच महाराष्टातील विवीध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी मला CSR FUNDING या विषयावर सर्व संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगितले होते. खरोखरच यासर्व संस्थांना मार्गदर्शन करताना एक वेगळाच अनुभव मिळाला होता आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनसोक्त उत्तरे मी दिली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांची लाडकी छोटी "आराध्या" हिच्या वाढ दिवसांच्या निमित्ताने ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. विशेष सांगायचे म्हणजे मला एक असा आनंद झाला होता की माझे मार्गदर्शन संपल्यावर माझे आदरणीय संस्था प्रमुख यांनी माझ्या बरोबर फोटो काढला तेव्हा मनाला वेगळाच अनुभव मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे अराध्याच्या जन्मदिना निमित्त राज्यातील १० संस्थाना प्रत्येकी रु. १० हजार रुपयांची मदत स्वरूपात देणगी देखील देण्यात आली आहे.
मला या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते म्हणून आदरणीय श्री. राहूल ढवान सर यांचे आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व संस्था प्रमुखांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच हा माझा मानसन्मान जो झाला आहे तो केवळ समाजातील माझे सर्व आदरणीय व्यक्ती आणि देणगीदार यांच्या आशीर्वादाने झाला आहे.याचे सर्व श्रेय त्यांना जाते.
आपला सेवक.
श्री.केशव धेंडे,सर (BA.LLB)
Date - 22/04/2018
आज संस्थेत वाढ दिवस साजरा करण्यासाठी आले होते. पुनम मॅडम यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस सर्व मुलांच्या बरोबर केक कापून साजरा करण्यात आला.
वाढ दिवसाच्या निमित्ताने सर्व मुलांना पाव भाजीची पार्टी देण्यात आली तसेच सर्व मुलांना भेटवस्तू देण्यात आले. सर्व मुलांनी खूप मजा केली. संस्थेत वाढ दिवस साजरा करण्यासाठी आले त्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून पुनम मॅडम यांचे आभार मानतो.
Date - 08/12/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट दिली आहे.
"SAKSHAM" हि पुण्यातील सामाजिक संस्था आहे यातील कार्यकर्ते हे IT क्षेत्रातील तसेच इतर कार्य क्षेत्रात चांगल्या प्रकारे नोकरी करत आहेत.या संस्थेच्या निर्मिती साठी तसेच सामाजिक क्षेत्रात आपला बहुमूल्य वेळ देणारे तरुण तरुणी समाजसेवक एकत्र येऊन "SAKSHAM" या नावाची सामाजिक संस्था स्थापन करून समाजातील गरजूंना मदत करत आहे. या संस्थेचे एक वैशिष्ट्य असे की संस्थेचे सर्व कार्यकर्ते, सभासद हे आपल्या पगारातील ठराविक रक्कम जमा करुन सामाजिक उपक्रम राबवित आहे.
आज माझ्या संस्थेला त्यांनी अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली आहे. या बद्दल SAKSHAM या संस्थेचे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो.
तसेच संस्थेच्या भेटीसाठी दुसरे माझे आदरणीय सहकारी पाहुणे आले होते. विशेष म्हणजे आलेल्या तिन्ही मॅडम या IT क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांचे कुटुंबीय हे देशाच्या सेवेत आर्मी आणि एअरफोर्स मध्ये आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
ॲड. केशव धेंडे, सर
Date - 05/06/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आपल्या हातून एखाद्या गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत केली तर त्याचे पुढे आपल्याला काय आशिर्वाद आणि समाधान मिळेल हे शब्दांत सांगता येणार नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण केलेली हि शैक्षणिक मदत त्या व्यक्तीच्या मनात घर करून आयुष्यभर लक्षात राहते कारण आई आणि वडील पुर्णपणे अंध व्यक्ती आहेत व घरची परिस्थिती बेताची असताना मुलं शिक्षण घेऊन पुढे स्वतःच्या पायावर उभे राहावे असे त्यांना वाटते.अशा परिस्थितीत माझ्या संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांनीला मी शैक्षणिक मदत केली होती. त्यामुळे तिने दहावीच्या परीक्षेत 66 टक्के मार्क्स मिळविले.
आज खास करून मी केलेल्या वेळेवर शैक्षणिक मदतीचे आभार मानण्यासाठी अंध वडील आणि त्यांची मुलगी मला भेटण्यासाठी माझ्या संस्थेत आले होते. मला खरोखरच खूप आनंद आणि मनाला समाधान वाटले की माझ्या हातून एका अंध कुटुंबातील मुलीला शैक्षणिक दृष्ट्या मदत केली होती म्हणून. वडिलांना मी शब्द दिला आहे की तिचे पुढचे अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने मदत करणार आहे.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 21/05/2023
नमस्कार संस्थेच्या भेटीसाठी समाजातील विविध स्तरांतील शैक्षणिक संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच मोठ्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थिनी त्यांचे शिक्षक हे सर्व येतात तेव्हा खरोखरच माझ्या संस्थेचे आणि माझ्या कार्याचे कौतुक होत आहे याचे खूप समाधान वाटतं व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी मोठी हिम्मत आणि उत्साह मिळतो.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्थेच्या कार्याची दखल घेऊन जेव्हा आपल्या जवळपास असणार्या CSR ACTIVITIES साठी कंपनी येतात तेव्हा जास्त करून संस्थेच्या कार्याची दखल घेतली जाते हे पाहून एक प्रकारे ताकद मिळते याचा खूप आनंद वाटतो. पण खरं सांगायचं म्हणजे या सर्वांचे श्रेय जाते ते माझे आदरणीय समाजातील सर्व घटकांना व माझ्या संस्थेचे आदरणीय कर्मचारी यांना.त्यांच्या मुळेच मी हे सर्व कार्य करू शकतो.या बद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 06/09/2022
नमस्कार आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की तुम्हां सर्वांच्या आणि गणपती बाप्पा यांच्या आशीर्वादाने माझ्या संस्थेच्या कार्याची दखल साता समुद्रापार घेतली गेली आहे. या गोष्टीचा माझ्या बरोबर माझ्या संस्थेचे आदरणीय स्टाफ तसेच सर्व मुले आणि माझ्या कुटुंबाला आनंद आहे.
आज माझ्या संस्थेला जागतिक पातळीवर सलग पाच पुरस्कार मिळाले आहेत याच बरोबर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यांनी सुद्धा माझ्या कार्याची दखल घेतली होती जी मी कोरोना काळात गरीब कुटुंबांमध्ये अन्नधान्य स्वरुपात मदत केली होती. खरोखरच माझ्या कार्याला हि खूप मोठी ताकद मिळाली आहे.
या बद्दल मी माझ्या संस्थेच्या वतीने " World Book of Records, London " यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
"वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन"
कौतुक पत्र
"निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे, महाराष्ट्र"
भारत तुमच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधण्याचा आणि कोनाडा तयार करण्याच्या तुमच्या प्रयत्नांबद्दल माझे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करणे हा माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. जसे महान प्रेरक ऍशले स्मिथ म्हणतात तसे तुमचे जीवन पूर्ण क्षमतेने जगा आणि तुमच्या स्वप्नांसाठी लढा. ठोस यश मिळवण्यासाठी तुमच्या आशा आणि स्वप्नांचा सल्ला घ्या.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंग्लंडच्या सेंट्रल वर्किंग कमिटी (CWC) च्या माननीय सदस्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आपले अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स तुमची क्षमता आणि उपलब्धी यांचे मनापासून कौतुक करते. मी तुमच्या भविष्यकालीन उपक्रमांसाठी, उपक्रमांसाठी आणि आगामी वर्षांमध्ये सार्वत्रिक स्फुलिंग यशासाठी माझ्या शुभेच्छा देऊ इच्छितो.
पत्र क्रमांक : UK / APR / 20633 तारीख : 17 ऑगस्ट 2022 94
Date - 28/01/2018
नमस्कार. आज पुण्यातील आनंद वाडकर हे आपल्या कुटुंबातील सर्व नातेवाईक यांना घेऊन संस्थेमध्ये आले होते. निमित्त होते, त्यांच्या छोट्या दोन मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी.
सर्व मुलांच्या बरोबर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व मुलांना पावभाजीची पार्टी देण्यात आली.अशा प्रकारे दोघा भावांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Date - 03/12/2022
नमस्कार,आज संस्थेच्या भेटीसाठी " KALYANI SCHOOL, Magarpatta, Hadapsar, Pune " येथील शाळेतील इयत्ता- नववी आणि आठवी वर्गातील माझे आदरणीय विद्यार्थी मित्र आले होते.
संस्थेच्या भेटीसाठी येण्याचे कारण म्हणजे या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील प्रोजेक्ट् साठी जवळपास असणारी सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या NGO ला भेट देऊन त्या संस्थेचे कार्य जवळून अभ्यास करता यावा म्हणून या सर्व माझ्या आदरणीय विद्यार्थी मित्रांनी माझ्या संस्थेची निवड केली आणि मला या शाळेतील शिक्षकांनी परमिशन लेटर देऊन पाठविले. संस्थेत आल्यावर या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर खूप आनंद आणि उत्साह दिसत होता. या सर्वांनी संस्थेच्या मुलांच्या बरोबर गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांच्या परीने प्रत्येकाने मुलांना भेटवस्तू दिल्या. खरोखरच मला खूप आनंद वाटतो की या लहान वयात या विद्यार्थ्यांना सामाजिक भान रहावे म्हणून शाळा सामाजिक प्रोजेक्ट करण्यासाठी प्रोत्साहन देतात. या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचे पालक आले होते आणि त्यांना सुद्धा संस्थेचे कार्य जवळून पाहता आले.
KALYANI SCHOOL चे माझे आदरणीय विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक तसेच या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे.
Date - 22/07/2022
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील " INNOVATIVE INTERNATIONAL SCHOOL,PUNE " या शाळेतील लहान मुले आणि त्यांचे आदरणीय शिक्षक स्टाफ आले होते. विशेष म्हणजे या लहान समाज सेवक विद्यार्थ्यांनी येताना संस्थेच्या मुलांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे शैक्षणिक साहित्य आणि थोडा किराणा सामान घेऊन आले होते.
माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती सर्व मुलांना आणि शिक्षकांना दिली. तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे माझ्या संस्थेच्या वतीने आभार मानले.
Date - 31/05/2018
आज संस्थेमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी आय टी मधील मित्र मंडळी आले होते. त्यांची मैत्रिण रुचिका हीचा वाढ दिवस सर्व मुलांच्या बरोबर केक कापून साजरा करण्यात आला.
संस्थेत वाढदिवस साजरा करण्यासाठी आले त्या बद्दल आम्ही सगळे त्यांचे मनापासून खूप आभार मानतो.
आपला.
केशव धेंडे,सर
Date - 29/06/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझे आदरणीय सहकारी मित्र वर्षा वाघजी मॅडम आणि आदरणीय प्रसाद कदम सर या दोघांनी एकत्र येऊन स्वतःचीच एक "INFINITY MEDIA HOUSE" नावांची कंपनी ससाने नगर, हडपसर, पुणे येथे स्थापन केली आहे.खूप वर्ष दुसर्याच्या कंपनी मध्ये काम केले होते परंतु दोघांनी मिळून एकत्र येऊन कंपनी स्थापन करून MEDIA क्षेत्रात कार्य करायला सुरुवात केली आहे.
कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी मला स्पेशल निमंत्रण दिले होते पण काही कारणास्तव जाता आलं नाही म्हणून आज वेळ काढून त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सदिच्छा भेट दिली. त्यावेळी या दोघांनीही माझा कृष्ण तुळस देऊन सत्कार केला.
वर्षा वाघजी मॅडम यांनी मला सामाजिक कार्यामध्ये खूप मोठी मदत केली होती तसेच मार्गदर्शन नेहमी करायचे या बद्दल मी त्यांचा नेहमी आभारी आहे. यापुढे यांना या क्षेत्रात भरभरून प्रतिसाद आणि यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून या दोघांनी सत्कार केला आहे या बद्दल त्यांचे आणि इतर सदस्य यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 06/06/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज संस्थेच्या भेटीसाठी भारतातील विविध सरकारी प्रकल्पांवर अधिकारी या पदावर कार्यरत असणारे माझे आदरणीय सर Mr. Mousham G Mhaskey ( Ministry of Tourism - Incredible India, MPSTDC, MPT, JAMMU & KASHMIR Tourism, NABARD, CANARA BANK ) हे आले होते आणि त्यांच्या बरोबर Symbiosis Collage चे माझे आदरणीय विद्यार्थी आले होते.संस्थेला भेट देण्यामागचे कारण म्हणजे आदरणीय Mousham G Mhaskey सरांच्या मार्गदर्शनाखाली " ANANDA VRIDDHI FOUNDATION, PUNE " हि संस्था स्थापन करून त्या मार्फत समाजातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि इतर गरीब संस्थांना मार्गदर्शन आणि मदत करणे हा त्यांचा उद्देश आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची पहिली सुरुवात माझ्या संस्थेच्या माध्यमातून केली आहे याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.
Oculus Quest च्या माध्यमातून मुलांना भारतातील ऐतिहासिक स्थळे किल्ले आणि जंगलातील प्राणी, निसर्ग सौंदर्य यांचे दर्शन प्रत्यक्षात समोर अनुभवायला मिळाले आहे. खरोखरच माझ्या सर्व मुलांना हा अनुभव खूप वेगळा होता आणि त्याचा अनुभव मुलांना मिळाला आहे.
Ms Aditi Rai (Intern - Ananda Vriddhi Foundation), Mr. Chetan Shinde (Cinematographer - Tellme Digiinfotech Pvt. Ltd.), Mr. Niranjan (Intern - Tellme Digiinfotech Pvt. Ltd.)हे सर्व जण आमच्या संस्थेत आले होते म्हणून आम्ही सर्व जण आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 18/06/2022
नमस्कार, आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की समाजातील माझ्या सर्व आदरणीय व्यक्ती आणि आदरणीय देणगीदार तसेच माझ्या संस्थेच्या सर्व आजी आजोबा आणि मुलांच्या आशिर्वादाने " सलाम पुणे" यामध्ये माझ्या आयुष्यातील घडलेल्या घटनांची लेख स्वरुपात छापून आले आहे.
आज मागे वळून पाहिले असता म्हणजे साल 2003 To 2022 या एकोणीस वर्षांचा कालावधी मध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत असताना खूप अडचणींना तोंड देत आज या ठिकाणी पोहोचलो आहे. आणि सुरुवातीपासून प्रामाणिकपणे काम करत आलो आणि त्याचे फळ म्हणून मला जागतिक पातळीवर सलग चार (International CSR Award And American Merit Council Appreciate Award - 21/11/2021) आणि स्थानिक पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत आणि हे सर्व शक्य झाले आहे ते मला समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे.
आज मला मनाला खूप समाधान आणि आनंद वाटतो की खरया अर्थाने माझ्या सामाजिक क्षेत्रातील वीस वर्षांच्या कार्याला समाज मनाची जोड मिळाली आहे. याबद्दल मी मनापासून सलाम पुणे या मधील सर्व आदरणीय टिमचे आभार मानतो. खरं पाहिलं तर याचे सर्व श्रेय मी माझ्या समाजाला आणि आदरणीय थोर देणगीदार यांना देतो. या सर्वांच्या आशिर्वादाने हे सर्व शक्य झाले आहे.
आपला सेवक,
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ,
महंमद वाडी, हडपसर, पुणे.
Date - 24/06/2018
नमस्कार. आज सायंकाळी नेहरू मेमोरियल हॉल, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात NELDA FOUNDATION, PUNE यांच्या संस्थेच्या वतीने 18 संस्थांना पुरस्कार देण्यात आले.
या पुरस्कारासाठी एकूण 83 संस्थांनी सहभाग नोंदविला होता.तसेच यातील संस्थांना मत देण्यासाठी जनतेकडून मतदान करण्यात आले.आणि यासाठी 4200 लोकांनी मतदान केले. आणि त्यापैकी 18 संस्थांना वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे या 18 संस्था मध्ये माझ्या संस्थेला पुरस्कार मिळाला.आज पर्यंत संस्थेला भरपूर पुरस्कार मिळाले आहेत.आणि हीच माझ्या कार्याची खरी समाजाकडून मिळालेली पावती आहे.
NELDA FOUNDATION, PUNE या संस्थेनी आम्हाला पुरस्कार दिला त्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून यांच्या टिमचे आभार मानतो.
Date - 18/11/2022
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझे आदरणीय सहकारी मित्र आणि जमिन खरेदी विक्री क्षेत्रातील नामवंत उद्योगपती श्री. सत्यवान कांबळे ( पप्पू शेट कांबळे) आणि त्यांचे सहकारी मित्र संस्थेच्या भेटीसाठी आले होते.
विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी त्यांच्या व्यवसायाला जोड म्हणून आध्यात्मिक मध्ये लक्ष केंद्रित करून दत्त गुरुंच्या प्रेरणेने पुढील आयुष्याची वाटचाल चालू आहे. कांबळे साहेबांनी त्यांचा वाढदिवस हा माझ्या संस्थेच्या मुलांना जेवण आणि धान्याच्या स्वरुपात मदत केली आहे. त्यांच्या वाढ दिवसांच्या निमित्ताने त्यांना पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा. तसेच संस्थेत येऊन वाढ दिवस साजरा केला आहे म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 08/07/2022
नमस्कार आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेची आणि माझ्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली जाते या गोष्टीचा खूप आनंद आणि मनाला एक समाधान देऊन जात आहे. यामुळे माझ्या वीस वर्षांच्या सामाजिक क्षेत्रातील प्रामाणिक कार्याला एका प्रकारे यश मिळाले आहे आणि यामुळे अजून जास्त सामाजिक कार्य करण्याची एकप्रकारे मला माझ्या पाठिशी शाबासकी मिळाली आहे.
हे सर्व सांगण्या मागे माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती मगरपटटा, हडपसर, पुणे येथील IT Company " A -" "CILICON STACK " AUSTRALIA . या कंपनीचे अधिकारी यांनी ऑनलाईन पाहिली होती. आणि त्यांनी मला फोन करुन संस्थेला भेट देण्यासाठी परवानगी मागितली होती. नंतर संस्थेला त्यांनी प्रत्यक्षात भेट दिली आणि संस्थेच्या माध्यमातून कंपनीला CSR मधून कसं काम करता येईल यावर चर्चा झाली. नंतर पंधरा दिवसांनी मला फोन आला की कंपनीचे Founder Director - Mr. LUAN TRAN ( AUSTRALIA ) ( CILICON STACK) आणि त्यांच्या मिसेस - TRAN आणि त्यांचे भारतातील कंपनीचे अधिकारी श्री . मुहम्मद अरीफ सर तसेच कंपनीतील कर्मचारी हे सर्व जण संस्थेत भेटायला येणार आहेत.
आज संस्थेच्या भेटीसाठी कंपनीने सर्व नियोजन केले होते. संस्थेच्या भेटीसाठी आल्यावर त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या पाहुणे मंडळींना संस्थेचे कार्य खूप आवडले म्हणून त्यांनी माझ्या संस्थेच्या बरोबर टायप करुन संस्थेला शैक्षणिक मदत केली .या मध्ये पाच मुलांना " EDUCATIONAL SPONSORSHIP" साठी मदत केली.
आज अभिमानाने सांगावेसे वाटते की हे सर्व शक्य झाले आहे ते माझ्या समाजाच्या मदतीने आणि आमचे आदरणीय थोर देणगीदार यांच्या आशीर्वादाने.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे. ( International CSR Award Wining NGO and American Merit Council Appreciate Award - 21/11/2021)
Date - 26/05/2022
नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेत पुणे रेल्वे पोलिस,पुणे स्टेशन यांच्याकडून दोन लहान मुलींना दाखल करण्यात आले आहे. विशेष सांगायचे म्हणजे मुलींना संस्थेत दाखल करण्या आधी आदरणीय शकीला शेख मॅडम यांनी भेट दिली होती.आणि संस्थेचे सर्व काम पाहून त्या मुलींना संस्थेत दाखल करण्यात आले. आणि मग मुलींच्या आईने विनंती केली होती म्हणून त्यांना माझ्या संस्थेच्या वस्तीग्रहात दाखल केले आहे. माझे आदरणीय सहकारी मॅडम शकीला शेख (Lady Head Constable RPF, Pune) आणि माझे आदरणीय सर RPF, Pune पोलिस प्रमुख श्री. बी.एस. रघुवंशी (Inspector - RPF, Pune) यांनी विशेष सहकार्य केले आहे. तसेच रेल्वे स्टेशन वरील (Sathi Relway Child line, Pune) या सर्वांचे मनापासून सहकार्य मिळाले आहे.
तसेच रेल्वे पोलिस यांना चोर पकडून देण्यासाठी प्रमाणिक मदत करणारा हुशार (मायलो डॉग) याला सुद्धा भेटण्याचा योग आला आहे. विशेष सांगायचे म्हणजे याठिकाणी म्हणजे रेल्वे स्टेशनवर सर्व लोकांच्या आदर स्थानी असलेले "मस्तान बाबा" यांचे त्या ठिकाणी दर्शन झाले आहे. असं म्हणतात की त्यांचे दर्शन सहसा होत नाही.
माझ्या संस्थेच्या वतीने आदरणीय श्री. रघुवंशी सर आणि आदरणीय मॅडम शकीला शेख तसेच साथी रेल्वे चाईल्ड लाईन चे सोशल वर्कर श्री.राजवीर सिंग आणि त्यांचे सहकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 18/06/2023
नमस्कार समाजातील माझे सर्व आदरणीय वडीलांना माझ्या संस्थेच्या वतीने आजच्या पितृ दिना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आजच्या पितृ दिना निमित्त संस्थेच्या वतीने रामटेकडी, हडपसर येथील वस्तीतील इयत्ता पाचवी ते दहावी मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत करण्यात आली आहे.काल पासुन महाराष्टातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. पण महत्वाचे सांगायचं म्हणजे समाजातील काही गरीब विद्यार्थ्यांना शाळेत जायचं आहे पण त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक फी आणि शाळेसाठी गणवेश उपलब्ध नाहीत हि खूप दुःखाची गोष्ट आहे. माझे खरोखरच मोठं भाग्य आहे की आजच्या पितृ दिना निमित्त समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत करता आली आहे. आजचा दिवस खुप सार्थकी लागला आहे.या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पालकांनी मला दोन दिवस आधी फोन केला होता आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन संस्थेच्या वतीने मदत करण्यात आली.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)

Date - 06/01/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी मगरपटटा येथील " EXL" Services.Com (I) Pvt. Ltd, Cyber City, Magarpatta City, Hadapsar, Pune. या कंपनीच्या शिष्टमंडळाने भेट दिली.
विशेष म्हणजे हि कंपनी संस्थेत येण्याचे कारण म्हणजे " BHUMI" Organizations हि साऊथची संस्था आहे यांनी आज माझ्या संस्थेत एक कार्यक्रम आयोजित केला होता म्हणून स्पेशल गेस्ट म्हणून EXL या कंपनीला सोबत घेऊन आले होते. संस्थेत आल्यावर कंपनीने माझ्या सर्व मुलांच्या बरोबर खुप मजा केली. नंतर सर्व मुलांना गिफ्ट देऊन खूश केले. एकंदरीत सर्वांनी संस्थेत खूप छान वेळ घालविला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. महत्वाचे म्हणजे संस्थेचे कार्य सर्वांना मनापासून आवडलं. निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या बरोबर जागतिक तसेच स्थानिक कंपनी येऊन संस्थेच्या बरोबर आपलं छोटंसं योगदान देतात यामुळे आम्हाला खूप समाधान वाटते.
EXL Company आणि BHUMI ORGANIZATION यांच्या शिष्टमंडळाने संस्थेला भेट दिली होती म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 10/03/2018
नमस्कार, आज संस्थेमध्ये सकाळी पुण्यातील आयटी पार्क मधील पुजा सिंह मॅडम ह्या त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन दोन जुळ्या बहिण भावांचा वाढ दिवस साजरा करण्यासाठी आले होते.
सर्व मुलांच्या बरोबर केक कापून छोट्यांचा वाढ दिवस साजरा करण्यात आला.
Date - 21/02/2023
नमस्कार आज आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेच्या वतीने गेल्या एकवीस वर्षात समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन सामाजिक, शैक्षणिक, मेडिकल आणि समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत कार्य पोहोचलेले आहे. यामुळे संस्थेचे कार्य हे स्थानिक,पुणे तसेच महाराष्ट्रात आणि भारताच्या बाहेर आणि जागतिक पातळीवरील विविध संस्था, मोठ्या कंपन्या यांच्या बरोबरीने आल्या मुळं मिळालेले "INTERNATIONAL CSR AWARD" हे माझ्या संस्थेचे खरोखरच मोठं भाग्य आहे. हे सर्व आज पर्यंत करत असलेल्या प्रामाणिक कार्याची दखल आहे.
याचीच दखल घेऊन पुणे येथील स्थानिक कंपनी "CUBE27 IT PRIVATE LIMITED COMPANY" MAGARPATTA, HADAPSAR, PUNE. यांनी निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर या माझ्या संस्थेला बरोबर घेऊन CSR ACTIVITIES मध्ये मोठी मदत केली आहे. यासाठी आज या कंपनीचे AMERICAN GUEST यांच्या हस्ते मला व संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. या बद्दल आम्ही सर्व जण कंपनीचे डायरेक्ट आणि त्यांची सर्व टिमचे मनापासून आभार मानतो.तसेच हा जो माझा सन्मान आहे तो केवळ माझ्या संस्थेच्या बरोबर असलेल्या समाजातील प्रत्येक घटकाला जातो म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून आम्ही आभारी आहोत.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
दिनांक - ०२/०१/२०१८.
नमस्कार , आज आमचे आदरणीय समाज सेवक श्री .सुनिल तात्या धिवार आणि त्यांचे सहकारी मित्र मंडळी संस्थ्येच्या वृध्दाश्रमात आणि मुलांच्या आश्रमात भेट देण्यासाठी आले होते .
तात्यांनी आजींची विचारपूस केली.वृद्धाश्रमातील कार्याबद्दल चौकशी केली . नलिनी मॅडम यांच्या कामाची प्रशंसा केली. त्या नंतर तात्यांनी मुलांच्या आश्रमाला भेट दिली .सर्व मुलांना नवीन स्वेटर भेट दिले .सर्व मुलांची आस्थेने चवकशी केली .
तात्या आणि त्यांचे सहकारी मंडळी संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून आभार मानतो.आपला ,
केशव धेंडे, सर .
संस्थापक अध्यक्ष -निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर .
Date - 10/04/2018
नमस्कार आज संस्थेमध्ये डॉ. निशिकांत अहिरराव हे भेटीसाठी आले होते. विशेष म्हणजे निशिकांत सर नुकतेच रशिया ( RUSSIA ) या देशात राहून डाॅक्टर कीचे शिक्षण पूर्ण करून आपल्या मायदेशी भारतात परत आले. सरांना माझे लहानपणीचे मित्र श्री. शशिकांत अहिरे मला भेटायला संस्थेत घेऊन आले होते.
डॉ. निशिकांत सर हे खूप कष्ट करून रशियात राहून मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन डाॅक्टर झाले. सरांना भेटून खूप छान वाटले.तसेच त्यांनी रशियात शिक्षण घेत असताना आलेले अनुभव सांगितले.
डॉ. निशिकांत अहिरराव आणि श्री. शशिकांत अहिरे हे संस्थेमध्ये आल्या बद्दल आम्ही सगळे त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.
आपला.
केशव धेंडे,सर
Date - 16/02/2018
आज संस्थेमध्ये. मगरपटटा , हडपसर पुणे येथील IT पार्क मधील श्री. अंकूर सर आणि त्यांची पत्नी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते.
BHAVYA ह्याचा 3 रा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. सर्व मुलांना खाऊ आणि भेट वस्तू देण्यात आली.
Date - 19/07/2024
नमस्कार आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गाडगीळ वस्ती यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे" या शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिनांक -08/06/2024 रोजी पाठविलेल्या शैक्षणिक साहित्य मागणीनुसार आज प्रत्यक्षात त्यांच्या शाळेत जाऊन 40 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.
खरं पाहता आज प्रत्यक्ष शाळेतील मुलांची घरची परिस्थिती माझे आदरणीय केंद्र प्रमुख श्री.पवार सर यांनी सांगितली तेव्हा वाईट वाटले आणि ह्या सर्व मुलांचे पालक हे ऊसतोड मजुर आहेत आणि काही पालक मोलमजुरी करणारे आहेत जे महाराष्ट्रातील विविध भागांमधून पोटापाण्यासाठी आलेले आहेत अशा मुलांना शैक्षणिक मदत केली आहे याचं खरोखरच समाधान वाटले आहे.
या सर्व 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करता आली आहे ती केवळ माझे आदरणीय सहकारी देणगीदार श्री. सुमित ढगे सर आणि त्यांचे आदरणीय सहकारी मित्र यांच्या मुळेच. म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 18/04/2022
नमस्कार मनापासून आपणांस सांगण्यास आनंद वाटतो की आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या प्रामाणिक कार्याला समाजातील सर्व साधारण व्यक्ती ते आदरणीय मोठे दानशूर व्यक्ती यांचा जेव्हा आपल्या सामाजिक कार्याला मनापासून मोठा पाठिंबा मिळतो तेव्हा एक गोष्ट नक्कीच निर्माण होते ते म्हणजे आपण गरीब व समाजापासून वंचित असणार्या लोकांसाठी कार्य करतो त्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होते.
याचे आत्ताचे उदाहरण म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती "प्रविण मसालेवाले " माझे आदरणीय सर श्री. राजकुमार चोरडिया हे आहेत. यांनी माझ्या संस्थेला 2011 रोजी वर्षभर पुरेल इतके धान्य घेण्यासाठी दर महिन्याला मोठी आर्थिक मदत करत होते.या मदतीमुळे त्यावेळी मला खूप मोठा आधार मिळाला होता. आणि म्हणूनच मी माझ्या सर्व मुलांना चांगल्या प्रकारचे दर्जेदार अन्न खायला घालू शकलो होतो.
तसेच अकरा वर्षापूर्वीचा जो विश्वास माझ्यावर होता त्याच विश्वासाला पात्र होत परत एकदा त्यांनी मला मोठ्या मनाने नवीन अनाथ आश्रमाला लाईट घेण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. आणि आम्ही खरोखरच त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि विशेष सांगायचे म्हणजे माझे आदरणीय सर श्री. गिरीश क्षिरसागर (प्रविण मसालेवाले कंपनी) यांचे या कार्यासाठी मोठी मोलाची मदत झाली आहे. त्यांच्या मुळेच हे सर्व शक्य झाले आहे. आणि यासाठी आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 26/12/2022
नमस्कार, नाताळ निमित्ताने समाजातील सर्व आदरणीय लहान थोर व्यक्तींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काल संस्थेच्या भेटीसाठी मगरपटटा, हडपसर, पुणे येथील IT COMPANY - AST" हि आली होती. निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या बरोबर CSR ACTIVITIES साठी त्यांनी नाताळ निमित्ताने एक छान कार्यक्रम घेतला.
संस्थेबरोबर कंपनीने CSR ACTIVITI घेण्यासाठी मला फोन केला होता. या कंपनीतील तरुण पिढीला संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि यांना संस्थेचे कार्य खूप आवडले. भविष्यात यापुढे संस्थेच्या बरोबर CSR Activiti करणार आहेत. एक समाधानाची बाब म्हणजे आजची तरुण पिढी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत आहे. खरोखरच या तरुण पिढीचे मी मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date -23/02/2018
आज संस्थेमध्ये सकाळी वाढदिवस साजरा करण्यात आला.रुपाली कोळसे यांच्या 25 व्या वाढ दिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या मुलांच्या बरोबर केक कापून वाढ दिवस साजरा करण्यात आला. तसेच सर्व मुलांना खाऊ देण्यात आला.
आज सर्व मुलांच्या बरोबर रुपाली ताई यांनी वाढ दिवस साजरा केला त्या बद्दल आम्ही सगळे त्यांचे मनापासून आभार मानतो.

Date - 20/03/2022
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील तरुण युवकांचा " FRIENDS" नावाचा एक ग्रुप आला होता. यांनी मला फोन करून संस्थेच्या भेटीसाठी विनंती केली होती. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना परवानगी दिली होती.
या FRIENDS ग्रूपमध्ये तरुण युवकांना त्यांनी सामिल केले आहे. या समविचारी तरुण युवकांनी एकत्र येऊन अनाथ आश्रमातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काहि करता येईल का आणि त्यांना शिक्षणासाठी मदत करुन एक मुल शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्याला पुढील शिक्षणासाठी मदत करणे हा त्यांचा हेतू आहे. यांनी संस्थेत येऊन सर्व मुलांच्या बरोबर खेळ, गप्पा मारल्या आणि खूप एन्जॉय केला.
आज मला अभिमान वाटतो की आजची तरुण पिढी सामाजिक क्षेत्रात मनापासून कार्य करत आहेत आणि हे खूपच अभिमानाची गोष्ट आहे. वरील FRIENDS GROUP संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
Date - 20/07/2023
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी महंमद वाडी, कोंढवा येथील इंग्रजी मिडीयम शाळा " VIBGYOR SCHOOL"येथील विद्यार्थी आले होते. लहानपणापासूनच या छोट्या विद्यार्थ्यांना सामाजिकतेची जाणीव निर्माण होऊन आणि आपल्या हातुन सामाजिक कार्य घडावे म्हणून शाळेतूनच यांना आता शिकवायला सुरुवात झाली आहे.यामधून एक गोष्ट मात्र नक्कीच चांगली होते ती म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या घरचे वातावरण आणि संस्थेतील मुलांचे वातावरण यातील फरक त्यांना कळायला लागतो.
मला खरोखरच खूप आनंद वाटतो की हे सर्व माझे आदरणीय छोटे समाजसेवक विद्यार्थी माझ्या संस्थेच्या भेटीसाठी येतात आणि यांचे सर्व श्रेय जाते त्या शाळेला, मुख्याध्यापक तसेच त्यांच्या सर्व आदरणीय शिक्षकांना. या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)

Date - 06/02/2024
नमस्कार आज नवचैतन्य मित्र मंडळ संचालित प्रज्ञा शिशु विहार, प्रज्ञा प्राथमिक विद्यालय आणि रमनलाल शहा माध्यमिक विद्यालय , आदर्श नगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे येथील माझे आदरणीय सर्व मुख्याध्यापिका वर्ग आणि शिक्षक तसेच त्यांचे स्काऊट गाईड चे विद्यार्थी आले होते. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून " एक मुठभर धान्य" या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या परीने मुठभर धान्य गोळा करून शाळेच्या वतीने माझ्या संस्थेला धान्याच्या स्वरुपात मदत केली आहे.
खरोखरच आज समाजामध्ये याची गरज आहे आणि ती ओळखून नवचैतन्य मित्र मंडळ संचालित सर्व विद्यालयातील मुख्यध्यापिकांनी विचार करून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेऊन त्यांचे हस्ते एक प्रकारे चांगली सेवा घडवून आणली आहे आणि या मदतीने समाजातील गरजूंना धान्यांच्या स्वरुपात मदत केली जात आहे आणि विशेष म्हणजे ती मदत स्वतः मुख्याध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थी संस्थेत येऊन देत आहेत. माझा या सामाजिक बांधिलकीसाठी या सर्वांना मनापासून सलाम.
माझ्या संस्थेला धान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली आहे त्या बद्दल माझ्या संस्थेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ. वैशाली नाईक मॅडम, श्रीमती, सुवर्णा ससाने मॅडम आणि सौ. कविता बडेकर मॅडम तसेच शिक्षक आणि स्काऊट गाईडचे विद्यार्थी वर्ग यांचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 14/03/2018
आज संस्थेमध्ये सायंकाळी वाढ दिवस साजरा करण्यासाठी पराग पेंढारकर सर हे आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन आले होते. पराग सरांचा वाढ दिवस सर्व मुलांच्या बरोबर केक कापून साजरा करण्यात आला.
ह्यावेळेस दोन महिन्यां पूर्वीच सरांचे लग्न झाले होते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिसेस व इतर मित्रांना बरोबर घेऊन आले होते. अशा प्रकारे सरांनी वाढ मुलांच्या बरोबर साजरा केला.
Date - 02/04/2022
नमस्कार सर्व प्रथम माझ्या आदरणीय सर्व व्यक्तींना गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझ्या संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आजची हि Post करण्यामागचे कारण म्हणजे आज माझ्या संस्थेत 19 वर्षांचा एक तरूण मला भेटायला आला होता. हा तरुण नागपूर येथून पुण्यात तीन महिन्यांपूर्वी आला होता आणि आता सध्या वडगाव शेरी येथे पत्र्याच्या भाड्याच्या खोलीत तो आणि त्याची आई असे दोघेही एकत्र राहतात. त्याचे वडील तीन महिन्यांपूर्वी देवाघरी गेले आहेत. वडीलांच्या जाण्याने या माय लेकरांना जवळ पैसे नाहीत आणि त्यामुळे त्यांना एकवेळ जेवणाची अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी या मुलाने खराडी येथे काम शोधून आहे त्या पगारातून आईला हातभार लावायला सुरुवात केली. कमी पगार तसेच घरभाडे,इतर खर्च यामुळे खुपचं वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मला कसं कळाले तर माझ्या मुलीच्या बरोबर हा मुलगा कामाला आहे. कामामध्ये तिला त्याच्या बद्दल कळाले होते. म्हणून मग माझ्या मुलीने त्याला सांगितलं की माझ्या बाबांचे अनाथ आश्रम आहे ते तुला नक्कीच मदत करतील.
हे ऐकून त्याला खूप मोठा आधार झाला आणि मग मला माझ्या मुलीने फोनवर सर्व त्यांच्या घरच्या परिस्थिती बद्दल सांगितलं आणि आज तो मला भेटायला आला होता. आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने काहितरी नवीन सुरुवात करायचा विचार करतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आज मला परमेश्वराने एक अनाथ गरीब कुटुंबाला अन्नधान्य या स्वरुपात मदत करून गुढी पाडवा निमित्ताने एक चांगले कार्य करण्याची संधी दिली आहे या बद्दल मी परमेश्वराचे आणि समाजातील सर्व व्यक्तींचे जे माझ्या संस्थेला मोकळ्या मनाने मदत करतात तसेच माझ्या मुलीचे मनापासून आभार मानतो.
आपला.
केशव धेंडे, सर (BA LLB)
Date - 24/09/2022
नमस्कार , आज संस्थेच्या भेटीसाठी माझे आदरणीय प्रा. किरण गायकवाड,सर ( विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन ) रिपब्लिकन ग्राहक परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे. तसेच सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आले होते.
सरांच्या अचानक भेटीने मनाला खूप आनंद झाला होता. सरांना माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली तसेच खूप वेळ सामाजिक क्षेत्रातील विषयांवर चर्चा करण्यात आली. सरांना माझ्या संस्थेचे कार्य जवळून पाहता आले म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता. सरांनी माझ्या संस्थेत येऊन माझा अनपेक्षितपणे जो सत्कार केला आहे त्या बद्दल मला खूप आनंद झाला आहे. मनाला खूप समाधान वाटते की माझ्या कार्याची दखल घेऊन सामाजिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती मान सन्मान करतात तेव्हा माझ्या सामाजिक क्षेत्रातील कार्याला एक प्रकारे मोठी ताकद मिळत चालली आहे. या बद्दल मी समाजातील सर्वांचे मनापासून आभार मानतो.
विशेष सांगायचं म्हणजे आता येणाऱ्या 2024 मध्ये निवडणुकीत नगरसेवक म्हणून आदरणीय श्री किरण सरांना माझ्या संस्थेच्या वतीने तसेच समाजातील आदरणीय व्यक्तींकडून भरभरून शुभेच्छा. तसेच सरांचे नगरसेवक या पदाचे स्वप्न पूर्ण व्हावे हि ईश्वर चरणी प्रार्थना.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date -01/07/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की गेली तीन महिन्यांपासून आदिवासी कातकरी, शेतकऱ्यांची गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना तसेच शाळेतील वस्ती ग्रहातील मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचा कार्यक्रमांचे नियोजन केले होते तो कार्यक्रम आज ". श्री विंझाईदेवी हायस्कूल ताम्हिणी,ता. मुळशी, जिल्हा, पुणे.या विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय जेष्ठ मंडळी तसेच इतर संस्थांचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे मुंबई वरून आदरणीय जेष्ठ मॅडम आणि स्थानिक पातळीवर पाहुणे तसेच पालक वर्ग सर्व उपस्थित होते.
मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार करुन मोठा सन्मान दिला होता तसेच माझ्या छोट्याशा भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मान मिळाला. खरोखरच आज खूप छान वाटले की माझ्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.मला या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.गफुर शेख सर आणि त्यांचे सर्व आदरणीय शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी आमंत्रण दिले होते म्हणून सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 08/05/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की संस्थेच्या भेटीसाठी माझे आदरणीय MPSC चे शिक्षण घेणारे विद्यार्थी मित्र आले होते. येण्याचे कारण म्हणजे मला भेटायला आणि माझ्या संस्थेचे कार्य जवळून पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी आले होते. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि त्यांच्या पुढील MPSC शिक्षणासाठी मार्गदर्शन करुन माझ्या संस्थेच्या वतीने भरभरून शुभेच्छा दिल्या. मला मनाला खूप समाधान वाटतं की आजची तरुण पिढी सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून संस्थेचे कार्य पाहण्यासाठी मला भेटायला येतात.
तसेच दुसऱ्या कार्यक्रमात मगरपटटा, हडपसर, पुणे येथील "ROTARACT CLUB OF MAGARPATTA TRENDSETTER" या संस्थेचे कार्य करणारे माझे आदरणीय विद्यार्थी मित्र संस्थेच्या भेटीसाठी आले होते. यांनी संस्थेच्या मुलांच्या बरोबर खेळ आणि गप्पा गोष्टी केल्या तसेच मुलांना खाऊ दिला. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेच्या भेटीसाठी आलेल्या सर्व माझ्या आदरणीय विद्यार्थी मित्रांचे संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 06/07/2023
नमस्कार आज संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा एक वर्षानंतर " वर्षा फाउंडेशन संचलित उत्तम वृद्धाश्रम", थेऊर, जिल्हा - पुणे.या वृद्धाश्रमाला अन्नधान्य स्वरुपात मदत करण्यात आली आहे. आणि त्या वृद्ध माता पितांना एकवेळ जेवणासाठी धान्याच्या स्वरुपात मदत केली आहे याचं मनाला खूप समाधान झाले आहे.
हि पोस्ट लिहिण्यामागे माझा हेतू चांगला आहे कारण आजची सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे. ज्या माता पितांनी आपलं सर्व आयुष्य मुलांच्या साठी घातलं आहे त्याच माता पितांना वृद्धापकाळात दुसर्यांवर अवलंबून रहावे लागते तेव्हा याच काळात खरं पाहता त्यांना एका आधाराची गरज असते.मला शक्य होईल तेवढी मदत माझ्या संस्थेच्या वतीने इतर गरीबांना करत असतो आणि यासाठी मला समाजातील आदरणीय देणगीदार व्यक्ती मदत करतात म्हणून माझी संस्था इतरांना मदत करु शकते. यासाठी माझ्या संस्थेच्या वतीने मी समाजाचे आणि आदरणीय देणगीदार यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 16/10/2022
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज हांडे वाडी, हडपसर, पुणे येथील "युवा क्रांति सोशल फाउंडेशन" या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमात सर्वांच्या लाडक्या आदरणीय सुप्रियाताई सुळे( भारताच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील राजकारणी व बारामतीच्या विद्यमान खासदार) यांनी "PUNE SOCIAL INNOVATION LEADERSHIP AWARD 2022" हा पुरस्कार मला मिळाला म्हणून ताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माझे आदरणीय सहकारी मित्र संस्थापक अध्यक्ष - युवा क्रांति सोशल फाउंडेशनचे कार्यसम्राट, सरपंच मा. पैलवान श्री. अशोक भाऊ न्हावले, हांडेवाडी, पुणे यांनी मला फोनवर सत्काराचे निमंत्रण दिले होते. जेव्हा मला समजले की माझा सत्कार आदरणीय सुप्रिया ताई सुळे (खासदार) या करणार आहेत तर मला खूप आनंद झाला. आणि याचे सर्व श्रेय आदरणीय अशोक भाऊ यांना आणि त्यांचे संस्थेचे पदाधिकारी तसेच आदरणीय माझे सर्व हांडेवाडी ग्रामस्थ तसेच माझे समाजातील आदरणीय व्यक्ती या सर्वांना जाते. म्हणून मी व माझ्या संस्थेच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर, पुणे.
Date - 05/11/2022
नमस्कार आज आपणांस कळविण्यास दुःख वाटते की माझ्या संस्थेत पूर्वी सहा वर्षे राहिलेला मुलगा राज गुरव याला लहानांपासून सांभाळले आणि कोरोना आधी संस्थेतून त्याच्या आई बरोबर घरी निघून गेला होता. आईला मी तेव्हा खूप समजावून सांगितले होते की त्याला घरी घेऊन जाऊ नकोस पण तेव्हा तिने माझं ऐकलं नाही. घरी गेल्यावर त्याला आईनेच गॅरेज मध्ये कामाला लावले होते. का तर घरात कमावता कोणी नाही. त्याचे शिक्षणाचे वय असताना आणि त्याला आईकडे रहायचं म्हणून तो आई बरोबर घरी निघून गेला.पण शेवटी मदतीसाठी त्याच्या आईने मला विनंती केल्यावर त्याला आज अन्नधान्य स्वरुपात मदत केली आहे.
तुम्हाला मला एवढेच सांगायचे आहे की मी आणि माझ्या संस्थेने कोरोना पासून गरीब कुटुंबांना आणि गरजवंताना माझ्या संस्थेच्या मुलांना आलेल्या अन्नधान्य स्वरुपात डोनेशन मधून मदती केली आहे कारण अन्नाची भुक काय आहे हे मला चांगलेच माहीत आहे. म्हणून माझं हे कार्य पाहून (WHO) जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली होती. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मला आज माझ्या संस्थेचे कार्य पाहून समाजातील माझे आदरणीय थोर देणगीदार मदत करतात म्हणून मी हि मदत समाजातील गरीब कुटुंबांना व गरजवंताना मदत करु शकतो. आणि यांचे सर्व श्रेय जाते ते फक्त माझ्या आदरणीय देणगीदार यांना म्हणून मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 10/03/2023
नमस्कार आज आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेची सामाजिक कार्याची दखल घेऊन "CUBE27 IT PRIVATE LIMITED COMPANY" MAGARPATTA, HADAPSAR, PUNE. यांनी निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर या माझ्या संस्थेला बरोबर घेऊन CSR ACTIVITIES मध्ये मोठी मदत केली होती. आज या कंपनीने मला परत फोन करून बोलावून घेतले होते आणि यापुढेही माझ्या संस्थेच्या बरोबर CSR ACTIVITIES साठी सहभागी करुन घेतले आहे. खरोखरच मला खूप आनंद झाला आहे.आम्ही सर्व जण कंपनीचे डायरेक्टर आणि त्यांची सर्व टिमचे मनापासून आभार मानतो.तसेच हा जो माझा सन्मान आहे तो केवळ माझ्या संस्थेच्या बरोबर असलेल्या समाजातील प्रत्येक घटकाला जातो म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून आम्ही आभारी आहोत.
तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेसाठी मार्केटस इंडिया नागरिकत्व निधी उभारण्यासाठी "Barclays Execution Services Limited Registered in England.Churchill Place, London. यांनी खूप महत्त्वाचे योगदान मिळाले आहे या बद्दल आम्ही सर्व जण BARCLAYS EXECUTION SERVICES LIMITED, LONDON यांचे मनापासून आभार मानतो.तसेच मला एक लक्षात आले आहे की माझ्या संस्थेच्या कार्याला जागतिक पातळीवर मदत होते हि खूप मोठी गोष्ट आहे.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)

Date - 31/05/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी हिंजवडी आयटी पार्क येथील कंपनी "NICE INTARACTI SOLUTIONS IND PVT. LTD, Hinjewadi Phase - 2, Pune." यांचे माझे आदरणीय इंजिनिअर स्टाफ आले होते.
या कंपनीचे HR Manager मॅडम यांनी एक महिना आधी माझ्याशी संपर्क साधून संस्थेला भेट देऊन CSR ACTIVITIE साठी विनंती केली होती. त्यांनी कालच पुन्हा एकदा मला फोन केला होता त्यांना हो सांगितले होते म्हणून आज हे सर्व जण आले होते. संस्थेच्या भेटीसाठी येताना CSR ACTIVITIE मध्ये कंपनीतील प्रत्येक सदस्यांनी आपापल्या परीने मदत एकत्र गोळा करून माझ्या संस्थेला अन्नधान्याच्या स्वरुपात मदत केली आहे.
आज खरोखरच आनंद वाटला आहे की संस्थेचे कार्य पाहून कंपनी तर्फे मदत केली आहे. या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 08/06/2018
नमस्कार आज संस्थेमध्ये PHILIPS कंपणीपुणे ह्याच्या तर्फे संस्थेतील सर्व मुलांना आणि आजुबाजुच्या मुलांना जागेवरच कलिंगडचा ज्युस तयार करून देण्यात आला.
हा कार्यक्रम PHILIPS कंपनी तर्फे CSR मार्फत करण्यात आला.
आपला,
केशव धेंडे,सर
Date - 07/08/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी आमचे आदरणीय भारतीय डोनर जे "US Countries" मध्ये स्थायिक झालेले आहेत ते आज सहपरिवारासह आले होते. विशेष म्हणजे भारतात आल्यावर प्रथमच ते माझ्या संस्थेत आले होते.
या कुटुंबांचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या संस्थेला मदत करण्यासाठी त्यांची दोन्ही मुलं आणि US मधील काॅलेजचे मित्र मैत्रिणी हे सर्व एकत्र येऊन त्यांच्या नोकरीच्या पगारातील छोटासा वाटा डोनेशन स्वरुपात गोळा करून पाठवत असे. यासाठी सर आणि मॅडम यांचे खूप मोठे योगदान आहे. संस्थेला मदत करताना त्यांनी माझे कार्य ऑनलाईन पहात असे मग फोन करुन मदत पाठवत असत.आम्ही सर्व भाग्यवान आहे की असे देणगीदार संस्थेच्या बरोबर आहेत म्हणून आम्हाला वेळोवेळी मदत होते.
माझ्या संस्थेच्या भेटीसाठी आलेले आमचे आदरणीय US चे कुटुंबिय यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 10/06/2022
नमस्कार, आज पुन्हा एकदा माझ्या संस्थेच्या वतीने एका गरीब कुटुंबाला अन्न धान्याच्या स्वरूपात मदत करण्यात आली आहे. आपणांस कळविण्यास आनंद पण वाटतो की ज्या गरीब कुटुंबाला मी मदत केली आहे हे कुटुंब आधी मी स्वतः लहान असताना एका नामांकित संस्थेत अनाथ आश्रमात लहानाचे मोठे झाले आहे. आणि त्या वेळी आम्ही सर्व जण एकत्र संस्थेत आल्यावर खूप खेळायचो. पण आज यांना खूप वर्षांनी पाहिले आणि ते लहानपणीचे दिवस माझ्या डोळ्यासमोर आले. आज या कुटुंबातील दोघा नवरा बायकोला आजाराने खूप नुकसान झाले आहे. त्यांना दोन मुले आहेत. आजारपणामुळे त्यांना घरात एकवेळ खाण्याचे वांदे झाले आहेत आणि आता सध्या मिसेस दवाखान्यात आहे. हे सर्व पाहून मनाला खूप दुःख झाले होते.
मला या कुटुंबाला मदत करण्यासाठी माझे आदरणीय गुरुवर्य श्री. अशोक घाडगे सर यांनी मला आज सकाळी फोन केला होता. याना मी लगेचच माझ्या संस्थेत बोलवून घेतले आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन लगेचच या कुटुंबाला मदत केली आहे.तसेच या दोघांना आधी जेवण दिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.मी स्वतः ला भाग्यवान समजतो की माझ्या अनाथ कुटुंबाला धान्याच्या स्वरूपात मदत करु शकलो आहे. तसेच मी गरीब कुटुंबाला मदत करू शकतो ते केवळ समाजातील माझे सर्व आदरणीय दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळेच. म्हणून मी आधी या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे,सर(BA.LLB)
Date - 28/10/2023
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी माझे आदरणीय महिलांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या आदरणीय महिलांच्या शिष्टमंडळा बद्दल सांगायचं तर या सर्व पुर्वीच्या एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रीण होत्या तसेच या सर्व मैत्रिणींचे लग्न झाल्यावर सुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहून तीच पूर्वीची मैत्री अजूनही घट्ट ठेवली आहे.
विशेष म्हणजे या सर्व आपापल्या कुटुंबात ऐश आरामाचे जीवन जगताना सुद्धा वर्षातुन एकदा सर्व एकत्रित येऊन सामाजिकतेची जाणीव ठेवून त्यांच्या प्रत्येकाच्या परीने मदत गोळा करून समाजातील सामाजिक संस्थेला भेट स्वरुपात मदत करतात हि आजच्या परिस्थितीत खूप मोठी गोष्ट आहे. या सर्वांचे मनापासून खरोखरच खूप कौतुक आहे.
आज या सर्व आदरणीय महिलांच्या शिष्टमंडळाने माझ्या संस्थेला भेट देऊन मदत केली आहे या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 08/02/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेतील एक कर्मचारी साक्षी ताई जीच आम्ही कोरोना मध्ये लग्न करुन दिले होते.जी एक एक अनाथ मुलगी आहे. यांना तीन दिवस आधी डॉ लोंढे हाॅस्पिटल, महंमद वाडी, हडपसर येथे दाखल केले होते.माझं फक्त नाव सांगितले तेव्हा लोंढे सरांनी लगेचच त्यांना दवाखान्यात दाखल केले.आणि बिल कमी करण्यासाठी मदत केली. तेव्हा त्यांच्याकडे बिल भरायला पैसे नव्हते लगेचच मी बिल भरले.
तसेच आई दवाखान्यातून घरी आल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी चार महिन्यांच्या बाळाला साने गुरुजी येथे आणले कारण आईचं Infection झालं होतं.बाळाला निमोनिया झालं आहे असं तपासणारे डॉक्टर यांनी सांगितले.लगेचच त्याला दवाखान्यात अडमिट करायला सांगितले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. मी तेव्हा पुण्यात एका मिटिंगमध्ये होतो. मला फोन केल्यावर मी लगेचच आदरणीय अनिल गुजर सर यांना फोन करून सांगितले आणि त्यांनी लगेचच मिटिंग सोडून वेळ न लावता बाळाला अडमिट केले होते या बद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
मला एक मोठं समाधान आहे की छोट्या बाळाला वेळेवर मेडिकल मदत केली आहे आणि यासाठी आमचे आदरणीय डोनर शालिनी शर्मा मॅडम यांनी लगेचच मदत केली आहे. त्यामुळे या बाळाला मेडिकल मदत करु शकलो. अजून बाळं दवाखान्यात दाखल आहे.आता पुढील औषधोपचारासाठी मी मदत करण्यासाठी प्रयत्न करतोय.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 12/06/2022
नमस्कार, आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेतील अनाथ मुलीचे कोरोना मध्ये लग्न लावून दिलं होतं त्या मुलीचं आज आम्ही सर्व आजी आणि मुलांच्या तसेच पाहुणे यांच्या उपस्थितीत " ओटी भरण आणि डोहाळे जेवण" हा घरगुती कार्यक्रम खूप मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दोघेही नवरा बायको तिचे आई बाबा बनून तिच्या ओटी भरणाचा कार्यक्रम पार पाडला.
आज हा कार्यक्रम पार पडत असताना दोघा नवरा बायकोच्या चेहर्यावर जो आनंद आणि समाधान दिसत होते ते शब्दात सांगू शकत नाही कारण तिला आई वडील हे माहितच नाही आणि कधी तिनं पाहिलं सुद्धा नाही तेव्हा तिला नक्कीच या क्षणी त्यांची आठवण आली असणार. पण ती आम्ही दोघांनी तिचे आईवडील बनून पूर्ण केली आहे. खरोखरच मनाला खूप मोठे समाधान आणि त्या दोघांचे आशिर्वाद आपोआपच आम्हाला मिळाले आहेत. महत्वाचे समाधान म्हणजे आपल्या हातून एका अनाथ मुलीचा संसार उभा राहिला आहे आणि तो ती खूप आनंदाने करत आहे. आम्ही दोघेही खूप नशीबवान आहे की आमच्या हातून हे चांगले कार्य पार पडले आहे.
जाता जाता मी आपणांस मनापासून सांगू इच्छितो की मला हे सर्व कार्य करण्यास शक्ती देणारा माझा आदरणीय समाज आणि आर्थिक पाठबळ देणारे माझे आदरणीय डोनर व्यक्ती यांचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.
आपला सेवक,
केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे. (International CSR Award Wining NGO & American Merit Council Appreciate Award - 21/11/2021)
Date - 19/02/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की काल संस्थेच्या कामानिमित्ताने दापोली येथे जाताना मुळशीच्या ताम्हिणी घाटात " श्री विंझाईदेवी हायस्कूल, ताम्हीणी, पोस्ट माले, ता.मुळशी जिल्हा.पुणे. या शाळेतील मुख्याध्यापक श्री.गफुर शेख सर यांनी दिनांक - 02/02/2023 रोजी शाळेविषयी चर्चा करताना मुलांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन मी लगेचच माझ्याकडे जमलेली शालेय स्टेशनरी गोळा केली आणि या शाळेतील आदिवासी समाजातील कातकरी विद्यार्थी तसेच शेतकरी गरीब, गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात त्यांनां दिली आहे.
या वेळी माझे आदरणीय सर्व विद्यार्थी मित्र यांना खूप आनंद झाला होता तसेच सर्व शिक्षकांना आश्चर्य वाटले की केशव सरांनी दिलेला शब्द पाळला आहे. तसेच त्यांचे वैयक्तिक मत होते की एखाद्या नवीन पाहुण्यांनी शाळेला भेट दिल्यानंतर मदत करतो म्हणून जातात आणि परत येत नाही किंवा विसरून जातात.मला सर्वात जास्त समाधान वाटले ते म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद भरभरून दिसत होता.आणि मी हि मदत करु शकलो आहे ती केवळ माझ्या संस्थेला मदत करणारे माझे आदरणीय दानशूर व्यक्ती यांच्यामुळेच म्हणून मी मनापासून या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे.
Date - 24/01/2023
नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की सातारा जिल्ह्यातील "गाव - सुंदरनगर(आंबळे)ता.पाटण येथील एका शेतकरी कुटुंबातील गरीब, होतकरू तरुण युवकाला माझ्या संस्थेच्या वतीने मदत करण्याचा योग आला.हया युवकाला कोणीतरी माझ्या कामाबद्दल सांगितले आणि भेटायला सांगितले. हा युवक आज पहाटे चार वाजता "पोलिस भरतीसाठी (State Reserve Police Force)रामटेकडी, हडपसर, पुणे येथे जाणार आहे. परंतु पुण्यात त्यांचे नातेवाईक, मित्र आणि ओळखीचे कोणी नसल्याने राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.अशावेळी मला भेटल्यावर मी लगेचच त्याला संस्थेत एक रात्र राहण्याची परवानगी दिली. काय सांगावे जर आज सकाळी त्याची निवड झाली तर त्याचे स्वप्न पूर्ण होईल.
समाजात असे अनेक होतकरू तरुण युवक आहेत की त्यांना स्वतःचे विश्व निर्माण करण्यासाठी खूप कष्ट आणि धडपड करावी लागते. अशा वेळी जर आपण त्यांच्या बरोबर राहून छोटीशी मदत केली तर त्यांना खूप आनंद होतो आणि ती व्यक्ती याची जाणीव ठेवते.मला शक्य आहे तेवढे सहकार्य करतो सर्वांना.माझ्या संस्थेच्या वतीने या युवकाला छोटीशी मदत.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 14/05/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज संस्थेच्या कार्याची दखल समाजातील सर्व थरांतील व्यक्तींच्या माध्यमातून घेतली जाते याचा खूप आनंद वाटतो. यामुळे सामाजिक कार्य करण्यासाठी मोठी उर्जा मिळते. आणि हे सर्व मी व माझी संस्था करु शकतो ते समाजातील सर्व आदरणीय व्यक्तींच्या आशिर्वादामुळेच.
आज संस्थेच्या भेटीसाठी "Allianz Services" Thiruvananthapuram, Kerala,( EON IT PARK, Kharadi, Pune, Maharashtra) कंपनीचे Deputy Manager - Shri. Amit Dhumal, Sir आणि त्यांचे सहकारी मित्र आले होते. हि कंपनी संस्थेच्या बरोबर CSR ACTIVITIES मध्ये काम करण्यासाठी पुढे आली आहे. यामुळे संस्थेच्या सामाजिक कार्यात मोठा सहभाग झाला आहे.
आज या निमित्ताने आपणांस हेच सांगावं वाटतं की पुण्या सारख्या गजबजलेल्या शहरात आपली संस्था सामाजिक क्षेत्रात गेली एकवीस वर्षे अहोरात्र कार्य करत आहे हे काही सोपं काम नाही.हे सर्व तुमच्या आशिर्वादाने शक्य झाले आहे आणि यामध्ये सर्वात जास्त आणि महत्वाचा सहभाग आहे तो माझ्या संस्थेच्या आदरणीय कर्मचारी व्यक्तींचा यांच्या सहभागाशिवाय मी हे कार्य करूच शकत नाही.या बद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 18/05/2018
नमस्कार. आज मला खूप वेगळी पोस्ट टाकावी वाटली. कारण मी नेहमीच माझ्या आणि संस्थेच्या कार्याच्या पोस्ट टाकत असतो.पण खूप वर्षांनी माझ्या लाडक्या आणि जिवलग मित्राची आठवण आली म्हणून त्या गोष्टी ला उजाळा मिळावा म्हणून त्याच्या बरोबर घेतलेला फोटो टाकत आहे.
माझ्या लाडक्या आणि प्रेमळ मित्राचे नाव जोजो असे आहे. मी दहा वर्षांपूर्वी अलिबाग येथील संस्थेमध्ये कामाला असताना जोजो ची ओळख झाली होती. हा माझा मित्र खूप खेळकर आणि प्रेमळ होता.आणि मला प्राण्यांची खूप आवड असल्याने आम्हा दोघांची छान मैत्री झाली.आज या मित्राची आठवण आली असल्या कारणाने त्या गोष्टी ला उजाळा मिळाला.
आपला,
केशव धेंडे,सर
Date - 12/07/2023
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी मगरपटटा हडपसर, पुणे येथील कंपनीचे आदरणीय शिष्टमंडळ भेटायला आले होते. संस्थेच्या कार्याची माहिती त्यांना मिळाली होती म्हणून संस्थेचे सामाजिक क्षेत्रातील योगदान जवळून पाहण्यासाठी एक महिना आधी त्यांनी मला फोन केला होता. आणि मग सर्व तयारी करून मदतीचे नियोजन केले.
मला खरोखरच खूप आनंद वाटतो की आज महाराष्ट्रातील नामवंत आयटी कंपन्या मला फोन करून माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी येतात आणि संस्थेला त्यांच्या परीने भरभरून मदत करतात.विशेष म्हणजे आजच्या परिस्थितीत आयटी कंपन्या कोणत्याही सामाजिक संस्थेला लगेचच मदत करत नाही. ते संस्थेचा अभ्यास करूनच मदत करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या संस्थेच्या सामाजिक कार्यात समाजातील सर्व घटकांच्या मदतीचा खूप मोठा सहभाग आहे म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
मगरपटटा, हडपसर, पुणे येथील कंपनीचे आदरणीय शिष्टमंडळ संस्थेच्या भेटीसाठी आले होते आणि त्यांनी केलेल्या मदतीचे माझ्या संस्थेच्या वतीने आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 25/02/2023
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील एक संस्था आली होती. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेत सर्व तरुण पिढी सामाजिक सेवेसाठी आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून सामाजिक कार्य करत आहेत. आणि यामध्ये या सर्वांचे खूप मोठे योगदान आहे.
"SHARVA AIKYAM FOUNDATION, PUNE" या संस्थेचे तरुण होतकरू समाजाची जान असलेले समाजसेवक संस्थेत आले होते. संस्थेत आल्यावर या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. नंतर या सर्वांनी सर्व मुलांना वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या तसेच मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व किती आहे या बद्दल मार्गदर्शन केले. शेवटी जाताना सर्वांना हसत खेळत गेम शिकविल्या.
मला एका गोष्टींचे समाधान वाटते की आजच्या तरुणाईला सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड आणि समज आली आहे हि खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट आहे या बद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. तसेच संस्थेच्या भेटीसाठी आर्मी मधील डॉक्टर हे त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन आले होते. त्यांनी त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 07/07/2018 BIRTHDAY CELEBRATION
Date - 02/03/2018
नमस्कार आज संस्थेमध्ये वाढ दिवस साजरा करण्यासाठी पाहुणे आले होते.
प्रिया येवाले हिचा मित्र प्रविण माने याचा वाढ दिवस संस्थेमध्ये साजरा करण्यात आला.यासाठी प्रिया हिचे सम्पूर्ण कुटुंब वाढ दिवस साजरा करण्यासाठी आले होते.
Date - 06/03/2023
नमस्कार शुभ सकाळ. सर्वांना माझ्या संस्थेच्या वतीने आणि वृद्धाश्रमातील सर्व आजीच्या कडून तसेच कुटूंबाकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आज आमच्या दोघांच्या लग्नाची सत्तावीस वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आमच्या दोघांच्या पाठिशी राहू द्या हिच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असेच तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन, आधार आम्हा दोघांना मिळू द्या. आज समाजात सामाजिक कार्य करत असताना सर्वांना बरोबर घेऊन त्यांचे शुभ आशिर्वाद आम्हाला मिळत आहे हे आमचे खूप मोठं भाग्य आहे म्हणूनच प्रत्येक दिवशी काम करताना मोठा उत्साह मिळतअसतो. आणि विशेष म्हणजे तुम्हा सर्वांच्या मदतीमुळेच आम्ही सामाजिक कार्य करु शकत आहे या बद्दल आम्ही दोघेही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे.
Date - 02/10/2022
नमस्कार आज माझे आदरणीय सहकारी मित्र संस्थापक अध्यक्ष युवा क्रांति सोशल फाउंडेशनचे कार्यसम्राट सरपंच मा.पै.अशोक भाऊ न्हावले, हांडे वाडी, हडपसर, पुणे. यांनी मला फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री. धनंजय हांडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित आदरणीय श्री. पप्पू मोरे साहेब ( क्रांतियुग मित्र मंडळ - अध्यक्ष ), श्री. संतोष नागवडे, श्री. सुमित परदेशी, श्री. अशोक मखरे, श्री. विशाल वरहटे, श्री. अमित परदेशी तसेच श्री. कुमार, श्री. गोफणे इत्यादी मान्यवर होते.तसेच समस्त हांडे वाडी ग्रामस्थ
विशेष सांगायचं म्हणजे मला मिळालेला पुरस्कार " PUNE SOCIAL INNOVATION LEADERSHIP AWARD 2022" याचे कौतुक केले आणि एक सामाजिक जाणीव ठेवून माझ्या सारख्या छोट्या सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार केला. या बद्दल भाऊंचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
आज स्थानिक पातळीवर सुद्धा आपल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेतली जाते आणि मोठ्या मनाने माझ्या कार्याच्या मागे उभे राहतात या बद्दल माझी संस्था समाजातील प्रत्येक व्यक्तीला सलाम करुन त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 16/08/2022
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या कार्याची दखल महाराष्ट्रातील विविध भागातून घेतली जात आहे. आणि खरोखरच प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचा योग्य तो सन्मान मिळतोच याचा प्रत्यय मला आलेला आहे.आज सामाजिक क्षेत्रातील वीस वर्षांच्या कार्याचा हा सन्मान आहे.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आंबेगाव तालुक्यातील " रयत शिक्षण संस्थेचे श्री मुक्तादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नारोडी गाव, जिल्हा.पुणे" या संस्थेने पंधरा ऑगस्ट - 2022 रोजी झेंडावंदन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 1986 साली मी लहानपणी अनाथ आश्रमात असताना या विद्यालयात खेळायला जायचो.आणि आज याच विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना सुरुवातीला मन भरून आले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी माझ्या संस्थेच्या वतीने सहकार्य करण्यासाठी मी सर्वोतोपरी मदत करणार आहे आणि त्या ठिकाणी आदिवासी मुलांच्यासाठी वस्ती ग्रह चालू करणार आहे.मला या विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते त्या बद्दल मी माझे आदरणीय कवी मित्र श्री. बाबाजी हुले आणि शाळा समिती तसेच आदरणीय सर्व माझे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदरणीय सर्व ग्रामस्थ मंडळी यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री.केशव धेंडे, सर (BA.LLB)
दिनांक - 26/01/2018
नमस्कार, आज सायंकाळी सहा वाजता पुण्याला अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केशव धेंडे सर यांना BEST ACHIVEMEANT AWARD " Nirankar Shikshan Prasarak Mandal.Hadapsar. हा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार मिळण्यासाठी आमचे आदरणीय मित्र श्री.निहाल कांबळे सर यांनी पुढाकार घेतला होता. या पुरस्काराचे खरे मानकरी माझ्या संस्थेमधील सर्व मुलांना जाते.
Dream Creators Event & Management , Pune. या संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे आम्ही सर्वजण मनापासून खूप खूप आभार मानतो.
Date - 02/01/2024
नमस्कार सर्वांना माझ्या संस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की समाजातील गरजवंत संस्थेला नेहमी मोकळ्या मनाने मदत करण्यासाठी प्रत्यक्ष पुढाकार घेऊन मदत करणारे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व श्री. क्षिरसागर सर यांना आज भेटण्याचा योग आला होता. योगायोगाने आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे म्हणून त्यांना माझ्या संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. नंतर काॅफी पेय घेत सरांच्या बरोबर संस्थेच्या कामा बाबतीत चर्चा झाली.
तसं पाहता प्रविण मसाले वाले कंपनी बरोबर आज बारा वर्षे झाली आहेत आम्ही सोबत आहे आणि अशावेळी आमचे आदरणीय क्षिरसागर सर यांचे मला सामाजिक कार्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रत्यक्षात मदत मिळालेली आहे. खरोखरच सरांच्या मदतीमुळेच आज माझ्या संस्थेच्या प्रोजेक्ट्स साठी खूप मोठी मोलाची मदत झाली आहे म्हणून मी सरांचे मनापासून खूप आभार मानतो.
प्रविण मसाले वाले कंपनीचे संस्थापक आमचे आदरणीय श्री. चोरडिया सर आणि त्यांचे कुटुंबीय तसेच माझे आदरणीय श्री. क्षिरसागर सर यांचे माझ्या संस्थेच्या वतीने आम्ही सर्व जण आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 13/07/2018 BIRTHDAY CELEBRATION
Date : 28/10/2024
नमस्कार सर्वांना प्रथम दिपावली निमित्त माझ्या संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Barclays UK (United Kingdom) हि जागतिक कंपनी आहे. या कंपनीचे भारतातील खराडी, पुणे येथील कंपनीचे ऑफिस मधील माझे आदरणीय सहकारी मित्र CSR ACTIVITIE अंतर्गत माझ्या संस्थेतील मुलांची दिवाळी साजरी करण्यासाठी पाहुण्यांना घेऊन आले होते.
आजचा दिवाळीचा पहिला दिवस मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला तसेच सर्व मुलांना नवीन कपडे देण्यात आले आणि सर्वांच्या बरोबर फटाके फोडून आनंद घेण्यात आला आहे. आजची पहिली दिवाळी सर्व मुलांनी आनंदाने साजरी केली आहे आणि यांचे सर्व श्रेय Barclays UK कंपनीचे माझे सर्व आदरणीय सहकारी मित्र आणि UK Guest यांना जाते. या सर्वांचे मनापासून आम्ही सर्व जण आभार मानतो.
आपला सेवक.
Adv. Keshav Dhende, Sir
Date - 27/05/2024
नमस्कार आज सुद्धा एका गरीब कुटुंबांतील लहान विद्यार्थी जो आता पाचवीला शिकत आहे त्याच्या आईने केलेल्या विनंतीवरून त्याला शैक्षणिक साहित्याची मदत करुन त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू निर्माण करण्यात मला समाधान लाभले आहे.
आपणांस सांगू इच्छितो की खरोखरच समाजातील गरीब कुटुंबातील मुल मुली शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आणि म्हणूनच मला शक्य होईल तेवढी शैक्षणिक मदत माझ्या संस्थेच्या वतीने गेली बावीस वर्षे करत आलो आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी हि जी शैक्षणिक मदत करतोय ते केवळ मला वेळोवेळी मदत करणारे माझे आदरणीय डोनर यांच्या आशिर्वादाने शक्य झाले आहे. तसेच आज संस्थेच्या भेटीसाठी माझे आदरणीय सहकारी मित्र मुंबई वरून आले होते.ते संस्थेच्या भेटीसाठी आले होते म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे,सर (BA.LLB)
Date - 02/06/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील एका संस्थेचे आदरणीय शिष्टमंडळाने माझ्या संस्थेला भेट दिली आहे.
हे शिष्टमंडळ "PHILANTS NGO, PUNE" या संस्थेतील होते. या संस्थेच्या शिष्टमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व समाजसेवक हे तरुण तडफदार नेतृत्व करणारे विद्यार्थी आहेत. यांनी माझ्या संस्थेच्या आश्रमातील मुलांच्या बरोबर छान Active केली. त्यांना संस्थेत खूप छान वाटले.तसेच त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती आधीच घेऊन आले होते. जाताना त्यांनी संस्थेला अन्नधान्याच्या स्वरुपात मदत केली.
Philants NGO, Pune या संस्थेतील माझे आदरणीय शिष्टमंडळ तसेच तरुण समाजसेवक संस्थेच्या भेटीसाठी आले होते म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
दिनांक - 08/05/2022
नमस्कार माझे आदरणीय सहकारी मित्र श्री. अविनाश राजभोज यांनी त्यांच्या बाळाच्या "प्रथम वाढदिवस अभिष्टचिंतन" या निमित्ताने माझ्या संस्थेच्या आश्रमाला देणगी स्वरुपात मदत केली आहे. याचे सर्व श्रेय जाते ते माझे आदरणीय सहकारी मित्र श्री.हरीष गलांडे यांना जाते. या छोट्याशा कार्यक्रमात वडगाव शेरी येथील माझे सर्व आदरणीय सहकारी मित्र एकत्र येऊन मला त्या ठिकाणी मदत केली आहे.
या ठिकाणी श्री.अविनाश राजभोज, श्री.हरीष गलांडे, श्री. संदेश गलांडे, श्री. विक्रम गलांडे, श्री.निलेश गलांडे, कमलेश गलांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मी माझ्या संस्थेच्या वतीने आदरणीय श्री.अविनाश राजभोज यांचे आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांचे मनापासून आभार मानतो. तसेच आदरणीय माझे सर्व सहकारी मित्र, वडगाव शेरी यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 04/01/2023
नमस्कार संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील नामांकित विद्यालय (DELHI PUBLIC SCHOOL, Mahamadwadi, Hadapsar, KALYANI SCHOOL, Magarpatta, Hadapsar,and WIBGYOR SCHOOL, Kondhava, Pune) या विद्यालयातील माझे आदरणीय विद्यार्थी मित्र आले होते.
हे माझे सर्व आदरणीय छोटे समाजसेवक सामाजिक क्षेत्रातील कार्यात सहभाग घेत आहे हे पाहून खूप आनंद वाटतो. आणि विशेष म्हणजे या लहान वयात या सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याची भान रहावे म्हणून त्यांच्या विद्यालयातच एक शैक्षणिक प्रकल्प म्हणून जवळपास असलेल्या सामाजिक संस्थेत भेट देऊन तेथील संस्थेचे कार्य जवळून अभ्यास करता यावे आणि या सर्व विद्यार्थ्यांना या सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. या बद्दल मी शैक्षणिक विभागांचे माझ्या संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो.तसेच माझ्या संस्थेच्या भेटीसाठी आलेल्या या सर्व माझ्या आदरणीय विद्यार्थी मित्रांचे माझ्या संस्थेच्या वतीने मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 14/05/2024
नमस्कार आज एका गरीब कुटुंबांतील दोन लहान बहिणींना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी तिच्या वडिलांनी मला फोन केला होता. त्यांनी मला फोन वर आठवण करून दिली होती की मागच्या वर्षी तुम्ही माझ्या दोन मुली आणि त्यांच्या एका दहावीच्या भावाला शैक्षणिक साहित्य मदत केली होती. आणि त्या बद्दल त्यांनी माझे आभार फोनवर मानले.तसेच आज पुन्हा एकदा त्यांनी मला त्यांच्या दोन लहान बहिणींना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी विनंती केली होती. मी लगेचच त्यांना सांगितले या म्हणून.या दोघीही सहावीत आणि आठवीत शिकायला आहेत.
जेव्हा आई आणि त्यांच्या मुली माझ्या संस्थेत आले तेव्हा त्यांना माझ्या वतीने शैक्षणिक साहित्य त्यांच्या हातात दिले आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेचच दिसून आला तेव्हा माझ्या मनाला खूप मोठे समाधान मिळाले.
मला आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की अजूनही मे महिना संपलेला नाही तरीही समाजात असे काही गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीची गरज आहे. मी नेहमीच मला शक्य होईल तेवढी मदत शैक्षणिक साहित्य देऊन करतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 25/06/2023
नमस्कार आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की सामाजिक क्षेत्रात काम करत असताना माझ्या संस्थेला आलेल्या सर्व प्रकारच्या मदतीतून त्यातील एक छोटासा हिस्सा मी समाजातील संस्था, शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वैयक्तिक गरीब कुटुंब आणि हुषार, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वैयक्तिक मदत करत असतो. या मदतीतून मला खूप मोठं मानसिक समाधान मिळते.कारण आज ती काळाची गरजच आहे. तुम्ही तुमच्या जवळचे दुसर्यांना मदत केली तर तीच मदत फिरुन पुन्हा तुमच्याकडे येते हा निसर्गाचा नियम आहे.आज त्याचेच प्रतीक म्हणून माझ्या संस्थेच्या वतीने मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातील "श्री. विझाईदेवी हायस्कूल, ताम्हिणी.या शाळेला मार्च व एप्रिल 2023 या महिन्यात शालेय स्टेशनरी दिली होती. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना स्टेशनरी व इतर शैक्षणिक साहित्य वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी मला निमंत्रण दिले आहे याचा मला आनंद आणि अभिमान वाटला आहे.खरं पाहता या माझ्या यशाच्या कामगिरी मागे मला मदत करणारे समाजातील लहान मोठे आदरणीय व्यक्ती यांना सर्व श्रेय जाते हा त्या सर्वांचा सन्मान आहे म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 13/06/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेच्या वतीने म्हणजे "निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे" आदिवासी वस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य मदत करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे संस्थेच्या वतीने प्रथमच पालघर जिल्ह्यातील तालुका जव्हार येथील दुर्गम भागातील वांगणपाडा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य मदत करण्यात आली आहे. माझ्या गैरहजेरीत हि मदत "कर्तव्यम चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या संस्थापिका आदरणीय श्री शीतल सोनवणे मॅडम यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने दिली आहे. हि संस्था दुर्गम भागातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करते.
माझं भाग्य समजतो की मला पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील वांगणपाडा या आदिवासी वस्तीतील लहान मुलांना शिक्षणासाठी मदत करता आली आहे. आणि यासाठी माझ्या संस्थेच्या वतीने मला मदत करणारे माझे आदरणीय देणगीदार यांचे तसेच कर्तव्यम चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचे संस्थापिका आणि त्यांचे आदरणीय सहकारी यांचे आम्ही सर्व जण मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 15/08/2024
नमस्कार सर्व प्रथम आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा
आजच्या या दिवशी संस्थेच्या भेटीसाठी पुरंदर तालुक्यातील माझे आदरणीय सहकारी मित्र आले होते. यामध्ये विशेष करून सासवड कोर्टातील काही माझे सिनिअर वकील तसेच उद्योजक आणि इतर क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे गुरूवर्य आदरणीय सिनियर वकील श्री.राणे साहेब यांनी माझ्या कोर्टाच्या केसेस बाबतीत भरपूर सहकार्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले होते त्यामुळे मला त्यांची खरी मदत झाली होती.तसेच राणे सरांनी संस्थेला अन्नधान्याच्या स्वरुपात मदत केली आणि सर्व मुलांना खाऊ वाटप केला.
तसेच जाताना माझ्या संस्थेच्या वतीने आमच्या लहान ओवीच्या हस्ते सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केला आणि माझे आदरणीय सिनियर वकील श्री. राणे साहेब यांचा सत्कार संस्थेच्या वतीने केला.महत्वाचे म्हणजे मी वकील झालो आहे ऐकून आदरणीय राणे वकील साहेबांनी माझा सत्कार केला.
आजच्या या दिवशी संस्थेच्या भेटीसाठी पुरंदर तालुक्यातील माझे आदरणीय सहकारी मित्र आले होते. यामध्ये विशेष करून सासवड कोर्टातील काही माझे सिनिअर वकील तसेच उद्योजक आणि इतर क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती म्हणून संस्थेच्या वतीने आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 21/08/2022
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील नामांकित काॅलेज (ST. MIRAS COLLEGE FOR GIRLS , PUNE, KOREGAON PARK) मधील माझे आदरणीय विद्यार्थीनी आल्या होत्या.
संस्थेच्या भेटीसाठी येण्याचे कारण म्हणजे त्यांना सामाजिक क्षेत्रातील विषयांवर एक प्रोजेक्ट्स बनवायचा होता. त्यांनी माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती ऑनलाईन पाहिली होती आणि मग मला फोन करून संस्थेत येण्यासाठी विनंती केली. संस्थेत आल्यावर त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली या सर्व विद्यार्थीनींना माझ्या संस्थेचे कार्य खूप आवडले. मला एक मोठं समाधान वाटते की आजची तरुण पिढी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास धडाडीने उतरत आहे. आणि या सर्वांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.
आपला सेवक
केशव धेंडे, सर (BA.LLB)
दिनांक - 06/02/2018
आज संस्थेमध्ये सायंकाळी काळे पडळ, हडपसर येथील खंडागळे कुटुंबिय लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते.
सर्व मुलांच्या बरोबर केक कापून वाढ दिवस साजरा करण्यात आला.
Date - 13/07/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी " CSR ACTIVITIE" साठी मगर पट्टा, हडपसर पुणे येथील IT Compani"BARCLAYS GLOBAL SERVICE CENTRE" ही कंपनी आली होती. हि जागतिक स्तरावर काम करणारी मोठी कंपनी आहे. माझ्या संस्थेच्या बरोबर CSR ACTIVITIE साठी सलग चार वेळा कार्यक्रम घेतले आहेत आणि "Online Crowd Funding" करीता भरपूर मदत केली आहे.
आज संस्थेच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक मदत करण्यासाठी BARCLAYS कंपनीने CSR ACTIVITIE घेतली आहे यामध्ये त्यांनी संस्थेला चांगल्याप्रकारे मदत केली आहे तसेच यापुढे दरवर्षी संस्थेच्या बरोबर विवीध कार्यक्रम घेणार आहेत. संस्थेत आलेले माझे आदरणीय सर्व कंपनीच्या लोकांना संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. माझ्या संस्थेचे भाग्य आहे की अशा जागतिक पातळीवर काम करणाऱ्या कंपनी सोबत आम्ही आहोत आणि याचे सर्व श्रेय जाते ते माझ्या संस्थेला मदत करणारे समाजातील आदरणीय व्यक्तींना यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 05/04/2023
नमस्कार आज संस्थेच्या वतीने एका गरीब कुटुंबातील हुषार विद्यार्थिनीला तिचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मदत करण्यात आली आहे.या मुलीचे वडील काल माझ्या संस्थेत भेटायला आले होते.एका खाजगी संस्थेच्या दवाखान्यात "Loundry Department" मध्ये काम करतात.ते जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांचा चेहरा खूप दुखी आणि रडवेला झाला होता. त्यांना विचारल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी काही मदत होईल का म्हणून मला विचारले. मुलीच्या अभ्यासाबाबत विचारले असता ती खूप हुशार आहे पण चालू शैक्षणिक B. Pharmacy याची फी भरणे बाकी आहे. वडिलांच्या कमी पगारामुळे तिची फी भरता येत नाही म्हणून मुलीला शिक्षक फि मागतील म्हणून आठवडाभर घरीच राहिली होती.आदल्या दिवशी मी "श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज" गाव - बोटा, ता. संगमनेर,जि.अहमदनगर, यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.शिवाजी पोखरकर सरांना फोनवर बोलून सर्व परिस्थिती सांगितली आणि मग आज प्रत्यक्षात माझ्या संस्थेची सर्व कामे सोडून काॅलेज मध्ये जाऊन सरांशी बोलून तिच्या फि साठी सवलत मागितली आणि त्यांनी लगेचच तिला फि भरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. हे सर्व ऐकून आणि पाहून वडीलांना आणि मुलीला खूप आनंद झाला. तेव्हा तिच्या आणि वडीलांच्या चेहर्यावर जे समाधान मला दिसले ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. एक गोष्ट मात्र की मला लगेचच तिची ऐंशी हजार रुपये फी भरता आले नाही पण पैसे नाहीत म्हणून काॅलेज न करता घरीच बसण्यापेक्षा तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण माझ्या विनंतीला मान त्यांनी दिला आहे.मला शक्य होईल तेवढी तिला शैक्षणिक मदत करणार आहे.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर ,(BA.LLB)
Date - 24/08/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की संस्थेच्या भेटीसाठी खास पाहुणे मंडळी आले होते.
"गुवाहाटी" हे भारत देशाच्या आसाम राज्याच्या राजधानीचे शहर आहे. तेथील स्थानिक संस्थेचे शिष्टमंडळाने माझ्या संस्थेला भेट दिली आहे हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे.या पाहुण्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली त्यांना संस्थेचे कार्य जवळून पाहता आले आहे म्हणून खूप आनंद झाला होता.
विशेष सांगायचं म्हणजे 2020 मध्ये अरुणाचल प्रदेश मधील एका संस्थेच्या शिष्टमंडळाने माझ्या कार्याची दखल घेऊन सत्कार केला होता त्यामुळे माझ्या संस्थेचे कार्य भारतातील अरुणाचल प्रदेश मध्ये पोहचल्याचे मोठे समाधान झाले होते.
संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत देत असल्याने त्यांच्या आशिर्वादाने संस्थेचे कार्य भारताच्या विविध राज्यांत पसरत आहे हि आनंदाची गोष्ट आहे. परंतु हे सर्व शक्य होण्यासाठी समाजातील सर्वांची साथ असल्याने झाले आहे त्यामुळे मी व माझी संस्था समाजाचे आभार आहे.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 31/12/2023
नमस्कार आपणांस कळविण्यात आनंद वाटतो की संस्थेच्या भेटीसाठी IT क्षेत्रातील नामवंत कंपनीतील टिम मेंबर आले होते.
"SysTools Software Pvt Ltd" P4, Pentagon, Magarpatta, Cybercity, Pune. या कंपनीचे आदरणीय HR - प्रिती मॅडम आणि श्री. ओंकार शिंदे यांच्या बरोबर त्यांचे इतर आदरणीय तरुण सहकारी वर्ग संस्थेच्या कार्याची माहिती जवळून पाहण्यासाठी आले होते. मी संस्थेच्या कार्याची माहिती त्यांना सांगितली आणि संस्थेच्या इतर प्रोजेक्ट्स बाबत माहिती दिली.
कंपनीच्या सर्व सहकारी वर्ग यांनी मुलांच्या बरोबर वेळ घालवून खूप आनंद घेतला. जाताना संस्थेला अन्नधान्याच्या स्वरुपात मदत केली.तसेच आर्थिक मदत केली आहे.भविष्यात माझ्या संस्थेच्या प्रोजेक्ट्स बाबतीत कंपनी बरोबर काम करण्यासाठी तयार झाले आहेत हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
"SysTools Software Pvt Ltd, Pune" या कंपनीचे HR मॅडम आणि त्यांचे सहकारी वर्ग संस्थेच्या भेटीसाठी आले होते म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 19/06/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की मला दोन दिवसांपूर्वी फोन आला होता की एका दिव्यांग कुटुंबातील मुलाला शैक्षणिक ड्रेसची आवश्यकता आहे तर तुम्ही मदत केली तर बरं होईल म्हणून विनंती केली होती. या विनंतीवरून माझ्या संस्थेच्या वतीने त्याला शैक्षणिक ड्रेस घेऊन देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मी प्रत्यक्षात त्याला भेटलो नाही पण त्याला सांगितले होते शालेय ड्रेस मिळाल्यावर मला फोटो काढून पाठव आणि त्याने ड्रेस घेतल्यावर मला फोटो काढून पाठवला आहे.आई दिव्यांग आहे आणि वडील सतत आजारी असतात. त्यांचा मुलगा सौरभ शिंदे इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे.
दुसऱ्या एका फोटोत एका विद्यार्थ्यांला त्याच्या विनंतीवरून माझ्या संस्थेच्या वतीने शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. तो आता " Information Technology" च्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे.खरं पाहता आज माझ्या संस्थेच्या वतीने समाजातील शिक्षणापासून वंचित असणार्या विद्यार्थ्यांना मदत होत आहे याच मला आणि माझ्या संस्थेला मोठं समाधान आहे.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 20/05/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी विविध स्तरांवरील माझे आदरणीय सहकारी मित्र मंडळी आले होते.
या मध्ये प्रामुख्याने "MIT COLLEGE, LONI KALBHOR, PUNE" यांचे विद्यार्थी मित्र आणि "COEP TECHNOLOGICAL UNIVERSITY" College of Engineering Pune. हे आदरणीय विद्यार्थी मित्र तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे आदरणीय इतर मोठे मंडळी आले होते.
विशेष म्हणजे आलेले सर्व माझे आदरणीय सहकारी मित्र मंडळी आणि इतर पाहुणे मंडळी यांच्या मध्ये काहिना काहितरी वैशिष्ट्ये होते. त्यांच्यातील समाजाप्रती असलेली सामाजिक जाणीव दिसून आली तसेच आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या जाणीवेतून त्यांनी संस्थेला मदत केली आहे. खरोखरच आजची पिढी ही सामाजिक कार्यात सहभागी होत आहे हि समाधानाची बाब आहे.
माझ्या संस्थेला वरील सर्व आदरणीय व्यक्तींनी भेट देऊन मदत केली आहे त्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 01/10/2023
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील एका संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या संस्थेच्या शिष्टमंडळाने मला भेटण्यासाठी फोन करून परवानगी मागितली होती. म्हणून आज त्यांनी स्वतःचा महत्वाचा वेळ काढून आले होते. संस्थेत आल्यावर त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे कार्य जवळून पाहिले आणि एकले म्हणून त्या शिष्टमंडळाला एक प्रकारे सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळाली.या शिष्टमंडळा बद्दल सांगायचं म्हणजे यातील सर्व तरुण व्यक्ती आयटी इंजिनियर्स आहेत आणि या सर्वांनी एकत्र येऊन एका सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे आणि त्याच्या अंतर्गत समाजातील गरजवंताना त्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम काढून मदत करतात. मला हे समजल्यावर या शिष्टमंडळाचे मनापासून कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.मला ह्या शिष्टमंडळाला मार्गदर्शन करायला मिळाले म्हणून एक समाधान वाटले. माझ्या संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल या शिष्टमंडळाचे आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 22/04/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की संस्थेच्या भेटीसाठी POSCO(South Korea) "INDIA STEEL DISTRIBUTION CENTRE PRIVATE LIMITED" World Trade Center, Kharadi, Pune या कंपनीचे भारतातील प्रकल्पाचे प्रमुख पाहुणे आले होते. संस्थेत आल्यावर या पाहुण्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.पाहुणे मंडळींना संस्थेचे कार्य खूप आवडले.
POSCO कंपनी माझ्या संस्थेच्या बरोबर 2020 पासून आहे आणि तेव्हा कंपनीने संस्थेला मोठ्या स्वरूपात मदत केली होती. तसेच कंपनी वेळोवेळी माझ्या संस्थेच्या कार्याची दखल घेत होती म्हणून आज "POSCO ISDC CSR ACTIVITIE - 2023 - 2024 या अंतर्गत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. POSCO ISDC, Pune या कंपनीचे भारतातील प्रकल्पाचे प्रमुख पाहुणे संस्थेत आले होते आणि माझ्या संस्थेला आणि वृद्धाश्रमाला मदत केली आहे या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.तसेच कंपनीचे आदरणीय श्री. अवजीत गोस्वामी सर यांनी यासाठी पुढाकार घेऊन संस्थेला मदत केली आहे म्हणून त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो.
आपला.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 30/07/2018
नमस्कार आज संस्थेमध्ये पुण्यातील " जनहितार्थ फाउंडेशन " या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. संस्थेत आल्यानंतर संस्थेबद्दल माहिती घेतली.
जाताना या संस्थेनी अन्नधान्य यांच्या स्वरुपात मदत केली.तसेच भविष्यात काही अडचण आल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जनहितार्थ फाउंडेशन, पुणे ही संस्था चांगल्या शाळा निवडून त्या शाळेतील गरीब मुला मुलींना शैक्षणिक साहित्य यासाठी मदत करते. त्यांचे हे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला माझ्या कडून आणि संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा.
संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्वजण या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.
Date - 23/11/2023
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी भारती विद्यापीठ, पुणे येथील नर्सिंग कॉलेजचे आदरणीय विद्यार्थी आणि शिक्षक तसेच आदरणीय प्रिन्सिपॉल मॅडम भेटायला आले होते. येण्याचे कारण म्हणजे बाल दिनाचे औचित्य साधून माझ्या संस्थेच्या मुलांच्या बरोबर विवीध विषयावर मार्गदर्शन केले आणि हसत खेळत मजा आणि खेळ खेळले.
एक महत्त्वाचे म्हणजे माझ्या संस्थेच्या बरोबर दोन वर्षांसाठी सोशल अँक्टिव्हिटी करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या कार्याची समाजातून विशेष दखल घेतली जाते याचे मनाला खूप समाधान वाटते.
माझ्या संस्थेत आल्या बद्दल आम्ही सर्व जण भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेजचे आणि आदरणीय प्रिन्सिपॉल मॅडम तसेच आदरणीय शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
दिनांक - 03/02/2018
आज संस्थेच्या मुलांना भेटायला सिम्बायोसिस काॅलेज, विमान नगर, पुणे येथील Second Year चे विद्यार्थी आले होते.
प्रथम सर्व मुलांना भेटल्यावर त्यांच्याशी छान गप्पा मारल्या. नंतर मुलांना जनरल नॉलेज बदल प्रश्न विचारले. नंतर सर्व मुलांना खाऊ दिला.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मुलांच्या बरोबर वेळ घालून मजा केली.
Date : 09/11/2024
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी "DECCAN EDUCATION SOCIETY'S, Shri. Navalmal Firodiya Law College,Pune या काॅलेजचे माझे आदरणीय Law Student आले होते.
मला भेटायला येण्यापूर्वी माझी आदरणीय सहकारी विद्यार्थीनी मानसी कापरे (1st Year Law Student) हिने फोन करुन परवानगी घेतलेली होती. त्यामुळे तिचे इतर आदरणीय सहकारी विद्यार्थी मित्रांना घेऊन संस्थेत आली होती. या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या संस्थेच्या मुलांना छान कायदेविषयक मार्गदर्शन केले जे त्यांना पुढील जीवनात त्याचा नक्कीच उपयोग होईल.या सर्वांना संस्थेत आल्यावर छान वाटले.
जाताना माझे आदरणीय सहकारी विद्यार्थी मित्रांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि माझ्या कडून त्यांना मार्गदर्शन केले. माझ्या संस्थेच्या भेटीसाठी Shri. Navalmal Firodiya Law College, Pune. यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी आले होते म्हणून माझ्या संस्थेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
ॲड. केशव धेंडे, सर
Date - 16/12/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज मला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत निमंत्रण मिळाले होते म्हणून गेलो होतो.
"KIDS HIVE " Pre School, Undri,Pune या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापिका यांनी "एक मुठ धान्य" हि संकल्पना शाळेत राबवून छोट्याशा विद्यार्थ्यांनी त्याला छान प्रतिसाद देऊन धान्याच्या स्वरूपात माझ्या संस्थेच्या मुलांना मदत केली आहे. माझे आदरणीय छोटेसे समाजसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. शाळेने विशेषतः मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः हून पुढाकार घेऊन "एक मूठ धान्य" हि संकल्पना राबवून प्रत्यक्षात साकार केली.
आजची समाजातील परिस्थिती पाहता शाळेत शिक्षणाचा पाया घडताना विद्यार्थ्यांना लहान वयातच त्यांच्या मनावर "ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी करण्याची, देण्याची गरज आहे " हि मोठी भावना यांच्या मनावर रुजली जात आहे हि फार मोठी गोष्ट आहे आणि हि खरोखरच समाजासाठी काळाची गरज आहे.
आज मला "KIDS HIVE" PRE School, Undri, Pune या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मला विशेष आमंत्रित करून अन्नधान्य स्वरुपात मदत केली आहे त्या बद्दल शाळेचे आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून आम्ही सर्व जण आभार मानतो.
आपला सेवक.
श्री.ॲड. केशव धेंडे, सर
Date - 01/11/2022
नमस्कार आज एक वर्षानंतर माझे आदरणीय सहकारी,समाज सेवेची आवड असलेले आणि हडपसर, पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक श्री. भामरे हिरालाल सर यांना भेटण्याचा योग आला आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये सरांना भेटून खूप आनंद झाला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती आधी मिळाली होती पण प्रत्यक्षात भेटल्यावर त्याची प्रचिती आली. सरांचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या संस्थेला न भेटता आणि मला न पाहता आदरणीय वैष्णवी मॅडम यांच्या माध्यमातून मला खूप मोठी मदत सरांनी केली होती. यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. जाताना सरांनी माझा छोटासा पण मोठा सन्मान केला. समाजात अशा काही व्यक्ती असतात की त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही बरया वाईट प्रसंगांना तोंड देऊन स्वतः चे एक चांगले विश्व निर्माण करतात आणि ते विश्व निर्माण करताना मागचे आयुष्य न विसरता समाजातील गरजवंताना मदत करतात त्याच व्यक्ती पुढे जातात आणि त्यांच्या पाठीशी साक्षात परमेश्वर असतो.
सरांना मला त्यांच्या ऑफिसमध्ये जो मान सन्मान दिला आहे या बद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 15/07/2023
नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेच्या वतीने कोरोना काळात एका अनाथ मुलीचं लग्न करून दिले होते. त्या लग्नाला आज एक वर्ष पुर्ण झाले आहेत आणि त्यांना एक छोटस गोंडस बाळ आहे.आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे.
आज हि पोस्ट लिहिण्यामागे मला खूप आनंद होत आहे याचं कारण म्हणजे एक अनाथ मुलगी जी लहानपणी जन्म झाल्यावर शेतात सापडली होती. नंतर तिचं संगोपन एका संस्थेने केले होते. त्याच मुलीचं मी कोरोना काळात लग्न करुन दिले होते. तसेच या दोघांनाही माझ्या संस्थेत कामाला घेतले आहे.आज हे जोडपं खूप आनंदाने आणि सुखा समाधानाने आयुष्य जगत आहेत हेच माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे.
मला आपणांस हेच सांगायचं आहे की एखाद्या अनाथ मुलीचं लग्न करून देऊन तिचं आयुष्य घडविण्यासाठी माझ्या हातून एक छोटंसं कार्य घडलं आहे या बद्दल मी देवाला मनापासून आभार मानतो आणि मी एक कर्तव्य पार पाडल्याचे समाधान वाटतं. आज पर्यंत मला समाजाने सामाजिक कार्यासाठी भरभरून मदत आणि शुभेच्छा दिल्या आहेत त्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 30/09/2022
नमस्कार, आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की समाजातील माझ्या प्रत्येक आदरणीय व्यक्तींच्या आशिर्वादाने मला आणि माझ्या संस्थेला "CSR WORLD" यांच्या हस्ते "PUNE SOCIAL INNOVATION LEADERSHIP AWARD 2022" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील IT Sector,Top Hotels and Top Education Institutions and Top NGO यातील एकूण दिडशे(150) व्यक्तींना निवडून या सर्वांना सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्कार कार्यक्रमामुळे या ठिकाणी मोठ्या कंपनी आल्या होत्या त्यामुळे माझे आणि माझ्या संस्थेचे कार्य यांच्या पर्यंत पोहोचले आहे. भविष्यात CSR ACTIVITIES साठी मला या सर्वांची सहज मदत मिळू शकणार आहे. मी माझ्या संस्थेचे भाग्य समजतो की खूप मोठा सन्मान मिळाला आहे.
तसेच महत्वाचे सांगायचं म्हणजे गेल्या 2019 पासून ते आज पर्यंत 2022 सलग चार वर्षे जागतिक पातळीवर आणि CSR मध्ये पुरस्कार मिळत आहेत. माझ्या या पुरस्काराचे खरे हक्कदार हा समाज आहे त्यांच्या आशिर्वादाने मी हे सर्व करु शकलो आहे.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 23/07/2018
नमस्कार आज संस्थेमध्ये अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला होता.
अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे आदरणीय मित्र श्री.अशिष भैया कांबळे ( राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग, पुणे शहर सरचिटणीस ) यांनी त्यांचे सहकारी सोनल पाटील मॅडम आणि सोनाली गाडे मॅडम यांच्या बरोबर संस्थेला अन्न धान्य यांच्या स्वरुपात मदत केली.तसेच या तिघांनी मिळून माझा सत्कार केला तसेच माझे कर्मचारी यांचा पण सत्कार
संस्थेत अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आल्या बद्दल आम्ही सर्वजण यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.
Date - 11/06/2024
नमस्कार आज संस्थेच्या कार्याची दखल समाज माध्यमातून घेतली जात आहे हि समाधानाची बाब आहे. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातील श्री विंझाईदेवी हायस्कूल, ताम्हिणी या विद्यालयाकडून मुख्यध्यापकांनी पुन्हा एकदा मला शाळेसाठी शैक्षणिक साहित्य देण्यासाठी विनंती पत्र पाठविले आहे. या शाळेतील सर्व विद्यार्थी हे डोंगराळ भागातील आदिवासी, कातकरी, शेतकरी कुटुंबातील असल्याने या विद्यार्थ्यांना खरोखरच शिक्षणासाठी मदतीची गरज आहे.
माझ्या संस्थेला विनंती पत्र पाठविताना विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या वतीने माझ्या संस्थेचे आभार मानले आहेत या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
तसेच आपल्या सर्वांना कळवू इच्छितो की माझ्या संस्थेच्या मुलांना आलेल्या देणगीतील शैक्षणिक साहित्य त्यांच्या गरजेनुसार ठेवून राहिलेले साहित्य मी समाजातील विविध गरीब विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक संस्थांना मदत करत असतो त्यामुळे या मदतीचे सर्व श्रेय माझे आदरणीय देणगीदार यांना जाते यामध्ये मी फक्त एक महत्वाचा घटक आहे.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
SEARCH ON YOUTUBE : KESHAV DHENDE
Date - 15/12/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, हडपसर, पुणे या माझ्या संस्थेच्या बरोबर जागतिक शैक्षणिक संस्था "Wellington College International, Kharadi, Pune." यांच्या बरोबर सामाजिक कार्यासाठी सोबत घेऊन काम करण्यासाठी ख्रिसमस निमित्ताने सुरुवात करण्यात आली आहे. माझ्या संस्थेचा हा मोठा अभिमान आहे International Education Institute "WellingtonCollege International,Kharadi, Pune" या काॅलेज मध्ये सध्या 1st to 7th वर्षा पर्यंतची सम्पूर्ण जगातील लहान मुलं मुली आणि भारतातील लहान मुलं सुद्धा शिक्षण घेत आहेत.
या काॅलेज मध्ये ख्रिसमस निमित्ताने सर्व छोट्या विद्यार्थ्यांना माझ्या संस्थेला मदत करण्यासाठी विनंती केली होती त्या प्रमाणे या सर्व छोट्या मुलांनी मदत करुन आज मला काॅलेज मध्ये बोलवून भेट दिली आहे. हि सर्व मदत पाहून मला खूप आनंद आणि समाधान वाटले. या लहान मुलांनी आणि काॅलेज मधील सर्व आदरणीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे त्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक,
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 07/01/2023
नमस्कार आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माझ्या संस्थेच्या भेटीसाठी सम्पूर्ण जगात आणि आपल्या भारतात विशेषतः पुण्यात मेडिकल फिल्डमध्ये नावाजलेली संस्था (ARMED FORCE MEDICAL COLLEGE - DEPARTMENT OF PHARMACY, PUNE - 411040) यांचे आपल्या देशाची सेवा करणारे माझे आदरणीय भावी जवान (ARMY, NAVY, AIRFORCE) या विभागातील 60 विद्यार्थी आले होते. माझ्या संस्थेचे भाग्य असे की संस्थेत येण्यापूर्वी DEPARTMENT OF PHARMACY यांचे प्रिन्सिपॉल मॅडम यांनी मला फोनवर माझ्या संस्थेच्या भेटीसाठी परवानगी मागितली होती आणि महत्वाचे म्हणजे मला परत माझ्या संस्थेच्या मेलवर परवानगीसाठी एक पत्र पाठविले होते. मी लगेचच त्यांना संस्थेच्या भेटीसाठी परवानगी दिली.
संस्थेत आल्यावर या सर्व माझ्या आदरणीय विद्यार्थी मित्रांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यांना संस्थेचे कार्य खूप आवडले आणि विशेष म्हणजे या सर्वांची एक गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे त्यांची शिस्त. या सर्वांनी माझ्या कार्याचे खूप कौतुक केले आणि शेवटी जाताना माझ्या संस्थेच्या वतीने या सर्वांना मनापासून सलाम करुन त्यांचे मनापासून आभार मानले.
आपला सेवक -
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 22/02/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की संस्थेच्या भेटीसाठी आज स्थानिक संस्थेतील " ससाने एज्युकेशन सोसायटीचे न्यु इंग्लिश स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज, ससाने नगर, हडपसर, पुणे यांचे आदरणीय प्रिन्सिपॉल मॅडम, शिक्षक वर्ग आणि माझे आदरणीय सर्व छोटे समाजसेवक विद्यार्थी वर्ग आले होते.
विद्यार्थीना लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि त्यांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून विद्यालयाने त्या सर्व विद्यार्थ्यांना "एक मुठ धान्य" या संकल्पनेतून धान्य गोळा करायला सांगितले होते.ते गोळा केलेले धान्य देण्यासाठी आज सकाळी शाळेतील प्रिन्सिपॉल मॅडम,सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी आले होते ते धान्य त्यांनी त्यांच्या हाताने संस्थेच्या मुलांना दिले.
माझ्या संस्थेला मदत केली आहे या बद्दल आम्ही सर्व जण ससाने एज्युकेशन सोसायटीचे न्यु इंग्लिश स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 28/05/2018
नमस्कार आज संस्थेत वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रगती येवले यांनी त्यांच्या मित्राला आमंत्रित केले होते.तिचा मित्र निलेश ह्याचा वाढदिवस मुलांच्या बरोबर केक कापून साजरा करण्यात आला.
संस्थेत वाढदिवस साजरा करण्यासाठी आले त्या बद्दल आम्ही सर्वजण प्रगती आणि त्यांचा मित्र निलेश ह्यांचे आभार मानतो.
आपला.
केशव धेंडे,सर
Date - 02/02/2023
नमस्कार काल संस्थेच्या कामानिमित्ताने दापोली येथे जाताना मुळशीच्या ताम्हिणी घाटात " श्री विंझाईदेवी हायस्कूल, ताम्हीणी, पोस्ट माले, ता.मुळशी जिल्हा.पुणे. या शाळेतील मुख्याध्यापक श्री.गफुर शेख सर यांना भेटण्याचा योग आला. शेख सरांनी माझे छान स्वागत केले. शाळेविषयी चर्चा करताना सरांनी मुलांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी विनंती केली आणि लगेचच मला त्या ठिकाणी शाळेच्या वतीने एक मदतीचे मागणी पत्र हातात दिले.
या शाळेत आसपासच्या वाड्या वस्त्यांमधील कातकरी समाज, आदिवासी समाज आणि शेतकऱ्यांचे गरीब कुटुंबांतील मुले मुली शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माझ्या संस्थेच्या वतीने या शाळेला मदत करणार आहे. माझ्या संस्थेचे भाग्य आहे की अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत करतोय.तसेच मला मोठ्ठा अभिमान वाटतो की महाराष्ट्रातील गरजवंत सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांना माझ्या संस्थेच्या वतीने शैक्षणिक दृष्ट्या मदत करुन त्यांना थोडाफार मदतीचा हात भार लावतोय.
विशेष म्हणजे या सामाजिक मदतीचे सर्व श्रेय मला मदत करणारे माझे आदरणीय व्यक्ती आणि देणगीदार या सर्वांना जाते. त्यांचा सुद्धा या सामाजिक मदतीत खूप मोठा वाटा आहे. माझ्या संस्थेच्या वतीने मनापासून सर्वांचे आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, पुणे
Date - 04/01/2024
नमस्कार आज संस्थेच्या कामानिमित्ताने दापोली येथे जाताना " श्री विंझाईदेवी हायस्कूल,ताम्हिणी, मुळशी या शाळेत माझ्या संस्थेच्या वतीने वस्ती ग्रहातील मुलांना तसेच विद्यालयातील आदिवासी, कातकरी तसेच शेतकरी यांचे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि वस्ती ग्रहातील मुलांना अन्नधान्य यांच्या स्वरुपात माझ्या संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा प्रत्यक्षात भेट देऊन मदत केली आहे.माझ्या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मदत देताना प्रत्यक्ष त्या मुला मुलींच्या चेहर्यावर जो आनंद आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्याचे समाधान दिसत होते ते मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. मला त्यांच्या बरोबर फोटो काढताना मनाला एक समाधान वाटले की खरोखरच गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत पोहोच केली आहे. विद्यालयातील माझे आदरणीय मुख्याध्यापक श्री. गफुर सय्यद सर आणि त्यांचे इतर आदरणीय शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांना खूप आनंद झाला होता माझ्या मदतीमुळे.
समाजातील प्रत्येक आदरणीय व्यक्तींना मी सांगू इच्छितो की माझ्या संस्थेच्या मुलांना आलेली प्रत्येक शैक्षणिक साहित्य मदत हि त्यांना मिळालेली असते आणि त्यांना देऊन उरलेले शैक्षणिक साहित्य मी समाजातील इतर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाटत असतो आणि याचे सर्व श्रेय माझ्या संस्थेला मदत करणारे आदरणीय देणगीदार यांना जाते. या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 20/04/2018 To 21/04/2018
नमस्कार. दरवर्षी प्रमाणे सर्व मुलांना घेऊन सहलीसाठी कोकणात दापोली येथे नेण्यात आले होते. हि सहल खरया अर्थाने मुलांना बाहेर चे जग कळावे म्हणून आयोजित करण्यात आली.आणि या सहलीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली.
या सहलीत दापोली येथील लाडघर बीच आणि कडाचा गणपती येथील स्थळे दाखवण्यात आली. सर्व मुलांनी खूप खूप मजा केली. एक दिवसाचा मुक्काम दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ , किसान भवन या ठिकाणी करण्यात आला.
अशाप्रकारे संस्थेच्या मुलांची सहल झाली.
Date - 14/01/2025
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की माझ्या संस्थेला सामाजिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्यरत असल्याने सामाजिक भावनेतून निमंत्रण मिळाले आहे.
"जनसामर्थ सामाजिक बहुउद्देशीय संस्था" बल्लारपूर, जिल्हा - चंद्रपूर येथील संस्थेचे सचिव माझे आदरणीय सहकारी मित्र श्री. पंकज परशूराम गणवीर आणि आदरणीय अध्यक्ष सौ. अश्विनी घनश्याम कोल्हेकर यांच्या कडून निमंत्रण मला मिळाले आहे. या संस्थेच्या आसपासच्या परीसरातील,गावातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परीस्थितीची पाहणी करुन संस्थेच्या माध्यमातून तेथील लोकांना काही मदत होईल का आणि एखादा सामाजिक उपक्रम राबवून लोकांचे जीवन सुधारण्यासाठी काही करता येईल का यासाठी मला निमंत्रण मिळाले आहे या बद्दल माझी संस्था खूप भाग्यशाली आहे.
मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की आज माझ्या संस्थेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सामाजिक उपक्रमांसाठी निमंत्रण मिळत आहे. आज माझ्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर "ओडीशा, छत्तीसगड, आणि गुजरात - अहमदाबाद येथील संस्थांना मार्गदर्शन करतोय हि खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे
आपला सेवक.
ॲड.श्री.केशव धेंडे, सर
Date - 02/03/2018
आज संस्थेमध्ये वाढ दिवस साजरा करण्यासाठी अग्रवाल कुटुंब आले होते.पुणीत याचा वाढ दिवस सर्व मुलांच्या बरोबर केक कापून साजरा करण्यात आला. संस्थेत पुनीत याचा वाढ दिवस साजरा करण्यासाठी अग्रवाल कुटुंब आले होते त्या बद्दल आम्ही सगळे त्यांचे मनापासून आभार मानतो.
Date - 01/08/2018
आज संस्थेच्या वृद्धाश्रमात VIBGYOR HIGH SCHOOL - NIBM, PUNE येथील इंग्लिश मिडीयम या शाळेतील इयत्ता 8 वी वर्गातील मुले मुली भेट देण्यासाठी आले होते. शैक्षणिक प्रोजेक्ट संदर्भात वृद्धाश्रमातील आजींना भेटायला आले होते.
सर्व मुलांना वृद्धाश्रमा बाबत माहिती दिली आणि नंतर सर्व वृद्धाश्रम फिरवून आणले.आणि आजीची ओळख करून दिली. मुलांनी आजी बरोबर चर्चा केली.जाताना मुलांनी आपल्या परीने शक्य होईल ती भेट वस्तू वृद्धाश्रमाला मदत केली.
संस्थेच्या वृद्धाश्रमात VIBGYOR HIGH SCHOOL- NIBM, PUNE या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी आल्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून आभार मानतो.
Date - 20/03/2023
नमस्कार आज आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की MSEB हेड ऑफिस, रास्ता पेठ, पुणे येथे माझे आदरणीय व्यक्ती माननीय श्री. मानिकराठोडसर(ExecutiveEngineer,MSEDCL,MulshiDivision,Pune)यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलावले होते. दुपारी तीन वाजता सरांना भेटायला गेलो होतो. सरांना पाहिल्यावर कर्तव्याची, सामाजिकतेची आणि सर्वांना मनापासून मदत करणारी व्यक्तीचे दर्शन घडले. माझ्या संस्थेच्या वतीने त्यांचा छोटासा सत्कार केला.
सरांना भेटायचं कारण म्हणजे त्यांनी माझ्या संस्थेच्या प्रोजेक्टवर MSEB चे नवीन कनेक्शन घेण्यासाठी खूप मोलाची मदत केली होती आणि विशेष म्हणजे सरांना मी आधी कधीही पाहिले नव्हते आणि त्यांनी मला पाहिले नव्हते तरीही संस्थेचे सामाजिक काम आहे म्हणून त्यांनी लगेचच इतर अधिकारी यांना सांगून माझ्या संस्थेचे लाईटचे नवीन कनेक्शन मिळवून दिले होते. आपण नेहमी बोलतो की सरकारी अधिकारी सामान्य माणसांचे काम करुन देत नाही पण आदरणीय राठोड सरांनी माझ्या विनंतीला मान देऊन लगेचच लाईटचे कनेक्शन मिळवून दिले आहे. या मदतीसाठी आम्ही सर्व जण त्यांचे आणि आदरणीय श्री. क्षिरसागर सर (नसरापूर विभाग,भोर) तसेच आदरणीय श्री. जुवेकर काका व आदरणीय अधिकारी वर्ग या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 04/05/2018
आज संस्थेमध्ये. " धग " या मराठी चित्रपटाचे निर्माते यांचे बंधू मा. श्री. वैभव गवारे हे त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांसह आले होते.
निमित्त होते स्वर्गवासी विशाल पंडीत गवारे ( धग याचे चित्रपट निर्माते ) यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच संस्थेला धान्य स्वरूपात मदत करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला त्यांचे मित्र मंडळी उपस्थित होती.
संस्थेत प्रथमच मराठी चित्रपटाचे निर्माते भेट देण्यासाठी आले होते. मा. वैभव गवारे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय तसेच मित्र मंडळी आणि माझे आदरणीय मित्र आप्पा कांबळे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहील्या बद्दल आम्ही सर्वजण मनापासून या सर्वांचे खूप खूप आभार मानतो.
आपला.
केशव धेंडे, सर
Date - 30/03/2018
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने सम्पूर्ण महाराष्ट्रात विधायक सऺदेशातून विवेकी समाज घडविण्याच्या उद्देशाने आयोजित " सोशल मीडिया- महामित्र " या उपक्रमातील यशस्वी सहभागा बद्दल हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
प्रमाणपत्र दिल्या बद्दल मुख्यमंत्री साहेचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
Date - 18/12/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज मला "St, Annes High School, Camp Pune" या विद्यालयाचे निमंत्रण प्रिन्सिपॉल मॅडम यांनी दिले होते म्हणून गेलो होतो.
"St, Annes High School, Camp,Pune हि एक कॉन्व्हेंट हायस्कूल आहे जी एक सरकारी मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाची मुलींची शाळा आहे. या शाळेची स्थापना 1860 मध्ये कॅम्प , पुणे , महाराष्ट्र, येथे स्थापन झाली. हि शाळा 164 वर्ष जुनी आहे.
माझ्या संस्थेला या शाळेत निमंत्रण देण्याचा मान मिळाला आहे कारण माझ्या संस्थेचे कार्य पाहिले आहे म्हणून त्यांनी शाळेतील इयत्ता- 3rd ABC च्या वर्गातील माझे आदरणीय लहान मुलींनी धान्य आणि ख्रिसमसच्या निमित्ताने काही वस्तू गोळा केल्या होत्या त्या माझ्या संस्थेला सन्मानपूर्वक देण्यात आल्या.
खरोखरच मला मनापासून आनंद झाला होता की मला अशा 164 वर्ष जुन्या शैक्षणिक संस्थेत बोलावून आणि माझ्या संस्थेला मदत केली आहे याचं समाधान वाटले आहे.
आज मलाSt.Annes Primary School"Camp,Pune या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मला विशेष आमंत्रित करून मदत केली आहे त्या बद्दल शाळेचे आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनापासून आम्ही सर्व जण आभार मानतो
आपला सेवक.
श्री. ॲड. केशव धेंडे, सर
Date - 30/12/2022
नमस्कार आपणांस मनापासून कळविण्यास आनंद वाटतो की या वर्षाच्या शेवटी " जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,केसापुरी, ता. माजलगाव, जिल्हा -बीड येथील ऊसतोड मजुरांच्या लहान मुला मुलींना माझ्या संस्थेच्या वतीने (निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमद वाडी, पुणे) सध्याच्या थंडीच्या वातावरणात पन्नास मुलांना स्वेटर्स चे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मला माझ्या संस्थेच्या आणि वैयक्तिक कामामुळे बीड येथे या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही पण माझ्या गैरहजेरीत हा कार्यक्रम छान झाला आणि या गरीब ऊसतोड मजुरांच्या लहान मुला मुलींच्या चेहर्यावर खूप आनंद झळकत होता हे पाहून मला मनापासून समाधान वाटले.
या ऊसतोड मजुरांच्या मुलांना थंडीसाठी स्वेटर्स ची मागणी बीड येथील "The Last Truth Foundation, Beed" या संस्थेचे अध्यक्ष सचिव आदरणीय श्री. हृषिकेश सर यांनी केली होती आणि त्यांच्या या विनंतीला मान देऊन माझ्या परीने हि छोटीशी मदत केली आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तेथील स्थानिक 1) बेडस्कर साहेब - तालुका शिक्षणाधिकारी, माजलगाव 2) शिनगारे सर - केंद्र प्रमुख आणि शाळेचे 3) किरण साळवे - मुख्याध्यापक तसेच 4) बाळू राठोड - ग्रामपंचायत सदस्य 5) अतुल सोळंके - अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती 6) विलास साळवे - ग्रामपंचायत सदस्य हे सर्व आदरणीय व्यक्ती आले होते.
मला या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील ऊसतोड मजुरांच्या लहान मुला मुलींना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्वेटर्स देण्याचे भाग्य मिळाले आहे या बद्दल मी माझे आदरणीय सहकारी मित्र श्री. हृषिकेश सर आणि आदरणीय इतर सर्व पाहुणे मंडळी यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 29/10/2022
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी माझ्या आदरणीय सहकारी समाज सेविका आणि सतत समाज कार्यात पुढे असणारया शुभांगी भोर मॅडम (डायरेक्टर- आंतर भारती बाल ग्राम, लोणावळा, पुणे) या आल्या होत्या. संस्थेत आल्यावर मॅडम आणि त्यांचे संस्थेचे सहकारी यांना माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. आदरणीय शुभांगी मॅडम यांना माझे कार्य खूप आवडले आणि मला त्यांनी पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
आज या भेटी दरम्यान एक संस्था प्रमुख आणि एका संस्थेच्या डायरेक्टर यांची भेट झाल्यावर अर्धा तास सामाजिक क्षेत्रातील विषयांवर आणि पुढे भविष्यात काही नवीन प्रोजेक्टवर छान चर्चा झाली. तसेच आजच्या भेटीत खूप काही पाॅझिटीव गोष्टींवर चर्चा झाली.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 18/03/2018
नमस्कार.आज गुढीपाडवा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वडगावशेरी , पुणे येथील " श्री भैरवनाथ प्रतिष्ठान वडगावशेरी " या मंडळाने रक्तदान शिबीर आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.या सोहळ्यात निरंकार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. केशव धेंडे आणि वृद्धाश्रमाच्या संचालिका नलिनी धेंडे या दोघांचा सत्कार आदरणीय मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील समाजसेवक तसेच खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला आमदार मा. श्री. बापूसाहेब पठारे , मा. श्री. योगेश मुळीक - अध्यक्ष स्थायी समिती, पुणे म.न.पा , सौ. सुनिता ताई गलांडे , नगरसेविका , अँड. संगिता ताई देवकर - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच मा. सौ. व शितल ताई शिंदे - नगरसेविका पुणे.आणि मा. श्री. संदिप ज-हाड नगरसेवक , पुणे. आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री भैरवनाथ प्रतिष्ठान वडगावशेरी या मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अक्षय बाळासाहेब गलांडेआणि इतर आदरणीय सदस्य या सर्वांचे मनापासून आम्ही खूप खूप आभार मानतो..
Date - 05/05/2023
नमस्कार आज खूप दिवसांनी एका गरजवंत संस्थेला आणि खास करून गरीब मुला मुलींना धान्याच्या स्वरुपात संस्थेच्या वतीने प्रत्यक्षात मदत करण्यात आली आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय भोसले सर हे माझ्या संस्थेच्या भेटीसाठी आज सकाळी आले होते.भोसले सर माझे काम फेसबुकवर नेहमी पहायचे आणि त्यामुळे त्यांना मला भेटण्यासाठी इच्छा झाली होती.
संकल्प वसतिगृह गेली सात वर्षांपासून निवासी प्रकल्पाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका राशीन गावामध्ये हालाकीच्या परिस्थितीतून गरीब निराधार ऊसतोड वंचित भटक्या आदिवासी पारधी समाजातील 40 पेक्षा जास्त मुलांचे त्यांचे आरोग्य पाहत शिक्षण संगोपन करत आहे.गेली सात वर्षापासून संकल्प वसतिगृहातील मुलांचा संगोपन करण्याचा तसेच निवारा देण्याचा संस्था आटोकाट प्रयत्न करत आहे. संस्था नोंदणीकृत असून संस्थेला कोणतेही अनुदान नाही. तसेच सर्व काम लोकसहभागातून केले जाते.
माझ्या मनात एकच गोष्ट आली की जशी माझ्या संस्थेची मुलं आहेत त्याच प्रमाणे त्यांची मुले सुद्धा माझीच आहे असं वाटून त्यांच्या संस्थेच्या गरीब मुलांना माझ्या संस्थेच्यावतीने मदत केली आहे. आणि हि मदत मी समाजातील आदरणीय दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमुळे करु शकलो आहे त्यामुळे या सहभागात त्यांचा खुप मोठा वाटा आहे त्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 07/01/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की संस्थेच्या भेटीसाठी आणि संस्थेचे कार्य जवळून पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी स्थानिक पातळीवरील स्टेट बोर्डाच्या शाळा आणि CBSE BOARD " DELHI PUBLIC SCHOOL" Mahammad wadi, Pune मधील नामांकित शैक्षणिक संस्थांमधील माझे आदरणीय सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच त्यांचे सर्व पालक वर्ग येतात तेव्हा खरोखरच खूप आनंद वाटतो.
विशेष म्हणजे या नामांकित शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी येण्याचे कारण म्हणजे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना "MY SEWA PROMISE" यांच्या अंतर्गत शालेय शिक्षण घेत असताना सामाजिक क्षेत्रातील मुलांच्या संस्थेत जाऊन त्या मुलांच्या बरोबर वेळ घालवून तसेच तेथील वातावरण जवळून पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी पाठविले जाते. त्यामुळे शालेय अवस्थेत असताना या गोष्टीचा मुलांना छान अनुभव मिळतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 02/07/2024
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज जळगाव येथील वयस्कर शेतकरी कुटुंबातील माझे आदरणीय आजी आजोबा यांनी त्यांच्या लाडक्या नातवंडांच्या शिक्षणासाठी मला गावी असताना विनंती केली होती की माझ्या नातवंडांना शिक्षणासाठी मदत होईल का म्हणून.
माझ्या संस्थेत काम करणारे विद्या ताई यांचे ते आई दादा आहेत त्यांनी सुद्धा मला विनंती केली होती या दोघांच्या विनंतीला मान देऊन आज त्यांना संस्थेत बोलावून प्रत्यक्ष हातात शैक्षणिक साहित्य दिले आहे. आज त्यांच्या हातात साहित्य देताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले होते.
मला आनंद आहे की शिक्षणासाठी धडपडणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देता येत आहे. आणि यांचे सर्व श्रेय माझे समाजातील आदरणीय व्यक्तींना जाते जे मला मदत करत आहेत.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 18/07/2023
नमस्कार आपणांस कळविण्यास आनंद वाटतो की आज गरीब गरजू आणि फक्त आई असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत करण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक जवळपास असलेल्या दुसऱ्या लोकांच्या शेतात काम करुन दिवसांच्या मिळणाऱ्या रोजंदारीवर संसार चालवतात. तुटपुंज्या रोजंदारीवर मिळणाऱ्या पैशातून मुलांचे शिक्षण कसे करणार अशा अडचणीत असलेल्या पाच कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ताम्हिणी घाटातील "विंझाईदेवी हायस्कूल , ताम्हिणी या शाळेसाठी पुण्यातील " कर्तव्यम चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे या संस्थेने पुढाकार घेऊन या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत केली आहे. यासाठी संस्थेच्या संस्थापिका आदरणीय शीतल सोनवणे मॅडम यांनी दोन महिने प्रयत्न करून हि मदत गोळा केली होती. यासाठी मॅडमचे आई वडील तसेच संस्थेचे आदरणीय सहकारी मंडळी यांनी पुढाकार घेतला होता. या शुभ कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतंशाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री गफूर शेख सर आणि त्यांचे आदरणीय शिक्षक वर्ग यांनी पुढाकार घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सहकार्य केले आहे त्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 31/10/2024
नमस्कार सर्वांना दिवाळीच्या भरभरून हार्दिक शुभेच्छा
आज संस्थेत "ROTARY CLUB OF PUNE HORIZON" यांचे शिष्टमंडळाने भेट दिली आहे.
"ROTARY CLUB" हि जागतिक पातळीवर सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत करतात.या कारणास्तव या संस्थेचे कार्य पुन्हा एकदा जवळून पाहण्याचे भाग्य मिळाले.या शिष्टमंडळाचे आदरणीय जेष्ठ पाहुणे आणि माझे आदरणीय सहकारी वकील मॅडम शहा तसेचे त्यांचे मिस्टर सोबत आले होते.
माझे आदरणीय सहकारी वकील मॅडम शहा यांनी मला फोन करून संस्थेत आले होते.रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या तर्फे दिवाळी निमित्त माझ्या मुलींना ड्रेस घेतले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला होता आणि सर्व मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
" ROTARY CLUB OF PUNE HORIZON" यांनी माझ्या संस्थेला भेट देऊन जी मदत केली आहे त्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
Adv. Keshav Dhende, Sir
Date - 04/03/2018
नमस्कार.आज संस्थेमध्ये मगरपटटा, हडपसर येथील श्री.जयेश शहा हे त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन आले होते. त्यांच्या मोठ्या मुलीचा 21 वा वाढ दिवस साजरा करण्यासाठी आले होते.
सर्व मुलांच्या बरोबर मनालीचा वाढ दिवस केक कापून साजरा केला.तसेच सर्व मुलांना तिच्या हस्ते भेट वस्तू देण्यात आले.
श्री.जयेश शहा सर संस्थेमध्ये आल्या बद्दल आम्ही सगळे त्यांचे मनापासून आभार मानतो.
Date - 11/02/2018
आज संस्थेच्या मुलांना हडपसर येथील Remedi Hospital येथे आयोजित कार्यक्रमात सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व मुलांच्या जनरल तपासणी करण्यात आली.
सर्व मुलांची आरोग्य तपासणी केल्या बद्दल आम्ही सगळे Remedi Hospital चे डाॅक्टर या सर्वांचे मनापासून आभार मानतो.
Date - 01/06/2018
नमस्कार आज संस्थेमध्ये सोशल वर्कर म्हणून काम करणाऱ्या वैशाली बागूल हीचा वाढदिवस सर्व मुलांच्या बरोबर केक कापून साजरा करण्यात आला.
सर्व मुलांनी मोठ्या आनंदाने वैशाली दिदीचा वाढदिवस साजरा केला.
आपला,
केशव धेंडे,सर
दिनांक - 04/02/2018
आज संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी पुणे येथील AJEENKYA D.Y PATIL UNIVERSITY ( School of Law) येथील First Year चे विद्यार्थी आले होते.
संस्थेमध्ये आल्यावर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री. केशव धेंडे सर यांना भेटून संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. नंतर सर्व मुलांना भेटले.
ही भेट त्यांच्या Study चा भाग होता.
Date - 30/06/2018 BIRTHDAY CELEBRATION
Date - 01/04/2024
नमस्कार संस्थेच्या भेटीसाठी पुण्यातील IT क्षेत्रातील माझे आदरणीय सहकारी मित्र आणि त्यांचे स्पॅनिश पाहुणे जे भारताच्या भेटीवर आले होते त्यांना बरोबर घेऊन आले होते.
स्पॅनिश पाहुणे भारतातील संस्थांना भेट देण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे भारतात ज्या संस्था मुलांच्या साठी काम करतात त्या संस्थांना भेटी देत होते. संस्थेच्या भेटी दरम्यान या पाहुण्यांना माझ्या संस्थेच्या बद्दल माहिती मिळाली. आणि मग पुण्यातील IT क्षेत्रातील त्यांचे सहकारी मित्र त्यांना माझ्या संस्थेत घेऊन आले होते. संस्थेत आल्यावर या सर्व पाहुणे मंडळींनी सर्व मुलांच्या बरोबर मनसोक्त धुलीवंदन खेळले आणि भरपूर मजा केली. या सर्वांनी संस्थेचे कार्य जवळून पाहिले आहे म्हणून खूप छान वाटले. संस्थेच्या मुलांच्या बरोबर हि पाहुणे मंडळींनी मनसोक्त आनंद लुटला त्यांना संस्थेतून निघावे वाटत नव्हते इतके ते खुश होते.
स्पॅनिश पाहुणे यांचे स्पेनमध्ये अनाथाश्रम उघडण्याचे त्यांचे स्वप्न होते म्हणून अनाथ आश्रमाचा अनुभव घेण्यासाठी भारतात आले होते. स्पॅनिश पाहुणे आणि माझे आदरणीय सहकारी मित्र हे संस्थेच्या भेटीसाठी आले होते म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला
Keshav Dhende, Sir.(BA.LLB)
Date - 30/03/2024
नमस्कार आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने माझ्या संस्थेला सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल Rotary Club चा "VOCATIONAL ZONAL AWARDS ZONE 4" या अंतर्गत " RC Pune Professional " या Categery मध्ये पुरस्कार मिळाला आहे.
विशेष म्हणजे सम्पूर्ण महाराष्ट्रातील 140 क्लब मधून बारा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी भारताच्या 1971 च्या युद्धात लढणारे माझे आदरणीय शुर कर्नल साहेब आणि ब्रिगेड साहेब यांना त्यांच्या देशसेवेसाठी आणि नंतर त्यांनी जवानांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्यासाठी मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.तसेच Cancer, Organ donation साठी तसेच अंध अपंग, मुक बधीर व्यक्तींसाठी कार्य करणारे आदरणीय व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
माझ्या कार्याची ROTRY CLUB, Pune Maharashtra यांनी दखल घेऊन मला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ROTRY CLUB हि "International Organization" आहे. या संस्थेच्या वतीने माझ्या कार्याचा गौरव करण्यात आला म्हणून आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक,
श्री. केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 13/11/2022
नमस्कार आज संस्थेच्या भेटीसाठी सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे येथील NSS चे विद्यार्थी आले होते. संस्थेत येण्याचे कारण म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी यांनी मला संस्थेच्या भेटीसाठी येण्याची विनंती केली होती. त्या विनंतीवरून मी लगेच आदरणीय माझ्या या विद्यार्थ्यांना परवानगी दिली म्हणून ते आज आले होते.
संस्थेत आल्यावर या विद्यार्थ्यांनी माझा आधी सत्कार केला. नंतर या सर्वांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यांनी नंतर संस्थेच्या सर्व मुलांच्या बरोबर खुप मजा मस्ती केली आणि उद्या बाल दिन आहे म्हणून केक कापून साजरा करण्यात आला. जाताना त्यांनी मला काॅलेज मध्ये एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काॅलेज तर्फे आमंत्रण दिले आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी संस्थेच्या भेटीसाठी आल्या बद्दल आम्ही सर्व जण त्यांचे मनापासून आभार मानतो.
आपला सेवक.
केशव धेंडे, सर (BA.LLB)
Date - 14/05/2018
नमस्कार.आज संस्थेमध्ये अहमदनगर येथील स्नेहालय या संस्थेचे समाजसेवक श्री. सुरज सुर्यवंशी सर आणि श्री.भुषण भगवंत साळुंखे सर सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. भेटीचे कारण की महाराष्ट्रातील संस्थांना भेटून त्यांचे कार्य जवळुन पाहायचे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचे. संस्थेच्या भेटी दरम्यान त्यांनी मला आदरणीय बाबा आमटे यांचे पुस्तक भेट दिली.
स्नेहालयाचे दोन्ही समाजसेवक यांनी माझ्या संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.खूप वेळ चर्चा झाली. आणि जाताना माझ्याकडून त्यांना मदतीचे आश्वासन दिले.
संस्थेला भेट देण्यासाठी आल्या बद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.
आपला,
केशव धेंडे,सर
संस्थापक अध्यक्ष - निरंकार शिक्षण प्रसारक मंडळ, महंमदवाडी, हडपसर पुणे.
फोन नंबर - 9561816451..